वाशिममध्ये बाजार समित्यांची कॅशलेसकडे वाटचाल
By admin | Published: January 16, 2017 06:26 PM2017-01-16T18:26:11+5:302017-01-16T18:26:11+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार समितींच्या सर्व व्यवहारात कॅशलेस पद्धती आणण्यासाठी जिल्हाधिकारी व उपनिबंधक कार्यालयाने सुरू केलेल्या प्रयत्नांना आता अंतिम स्वरूप
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 16 - कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार समितींच्या सर्व व्यवहारात कॅशलेस पद्धती आणण्यासाठी जिल्हाधिकारी व उपनिबंधक कार्यालयाने सुरू केलेल्या प्रयत्नांना आता अंतिम स्वरूप येत आहे. ह्यआरटीजीएसह्णने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.
500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीनंतर प्रत्येक व्यवहार कॅशलेस पद्धतीने करण्याचे प्रयत्न शासनातर्फे सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार ह्यकॅशलेसह्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी बाजार समिती प्रशासन व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वाटचाल सुरू केली आहे. स्वाईप मशिनद्वारे तसेच आरटीजीएसद्वारे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात शेतमालाची रक्कम जमा करण्याची सूचना द्विवेदी यांनी केली. धनादेशद्वारे रक्कम देण्यात काही अडथळे येतात. त्यामुळे स्वाईप मशिन किंवा आरटीजीएस पद्धतीने तत्काळ संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. या सूचनेची अंमलबजावणी म्हणून आरटीजीएस पद्धतीने शेतमालाची रक्कम देण्याला व्यापाऱ्यांनी संमती दर्शविली आहे. बँक खाते क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते उघडण्यासाठीदेखील बाजार समिती व व्यापाऱ्यांनी प्रयत्न करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या. शेतकऱ्यांनीदेखील बँक खाते उघडून कॅशलेस व्यवहाराला चालना द्यावी, असे आवाहन राहुल द्विवेदी यांनी केले.