बाजार समित्या आॅनलाईन
By admin | Published: March 29, 2017 03:20 AM2017-03-29T03:20:36+5:302017-03-29T03:20:36+5:30
शेतमालाला देशपातळीवरील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या
पुणे : शेतमालाला देशपातळीवरील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या आॅनलाईन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात पुणे, मुंबई, नाशिक या प्रमुख बाजार समित्यांसह ३० समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेत एकुण ६० बाजार समित्या झाल्या आहेत.
शेतमाल विक्रीत होणारी मध्यस्थी थांबविणे, शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने मागीलवर्षी ई-नाम ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे देशातील बाजार समित्यांचे व्यवहार आॅनलाईन होणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांमध्ये पुण्यासह मुंबई व नाशिक मोठ्या समित्यांचा समावेश झाला नव्हता. दुसऱ्या टप्प्यात तीनही समित्यांसह राज्यातील ३० समित्यांचा समावेश झाला आहे. (प्रतिनिधी)