शालेय खरेदीसाठी बाजारात धूम...
By admin | Published: June 10, 2016 01:09 AM2016-06-10T01:09:35+5:302016-06-10T01:09:35+5:30
शाळा सुरू होण्यास दोन-तीन दिवसच उरले असल्याने शालेय खरेदीसाठी बाजारात धूम आहे.
पुणे : शाळा सुरू होण्यास दोन-तीन दिवसच उरले असल्याने शालेय खरेदीसाठी बाजारात धूम आहे. बॅगा, वह्या, कंपासबॉक्स सारख्या वस्तूंनी दुकाने सजली आहे.
उन्हाळ््याची सुट्टी संपली की, मुलांना चाहूल लागते ती शाळा कधी सुरु होणार यांची. मी जुनी बॅग नाही वापरणार, मला नवीन बॅग घ्यायची’ असे संवाद घरोघरी एकू येतात. नवीन बुट, वहया, टिफिन, वॉटर बॅग अशा विविध वस्तूची मागणी मुले पालकांकडे करीत आहेत.
बाजारपेठामध्ये मुलांच्या आवडीनुसार विविध बॅग्ज आलेल्या आहेत. यामध्ये किडस बॅग्ज, फ्लाईंग थंडर, बेन-१०, बाल हनुमान, प्रिन्सेस, बार्बी डॉल, फॅब्युलस किडस, छोटा भीम, स्पायडर मॅन, क्युट बेबी यांना विशेष मागणी आहे.
वरच्या वर्गातील मुले प्लेन बॅग खरेदी करणे पसंत करतात तर
मुली प्रिटेड कॅनव्हास कपडयातील किंवा स्टार प्रिटेंड सॅक घेणे पसंत करताना दिसत आहेत. या बॅग्ज च्या किंमती २४० पासून ते ५०० रुपयापर्यंत आहेत.
टिफीन बॅगही आकर्षक रंगात
टिफिन बॅग मध्ये सुध्दा आकर्षक कलर तसेच मोटू-पतलु,डोरेमॉन, बाल हनुमान असे विविध प्रकार बच्चे कंपनीसाठी आलेले आहेत. बॉटल आणि टिफिन मध्ये सुध्दा विविध कार्टुन्स व प्राण्यांची चित्रे प्रिंट केलेली आहेत त् यांच्या किंमती ५० रुपयांपासून ते २०० रुपयापर्यंत आहेत.
लहान जास्त कार्टुन असलेल्या बॅग्ज आवडतात. त्यामुळे त्यांची आवड ओळखून आम्ही कार्टुनच्या बॅग्ज मोठया प्रमाणात विक्रीसाठी आणल्या आहेत. मुलांच्या मागणीनुसार लाइट वेट सॅक, कॅनव्हास प्रिटेड सॅक, टिफिन बॅक, वॉटरबॅग विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- विक्रेते
माझी मुलगी अत्ता ६ वी मध्ये आहे तीच्या आवडीनुसारच मी तीच्या शाळेची खरेदी करीत आहे. कोणती बॅग किंवा कोणती टिफीन बॅग आवडते तशीच मी घेणे पसंत करते. कारण मुलांच्या आवडी जपल्यावर आम्हाला पण एक वेगळेच समाधान मिळते त्यांच्या निरागस चेहऱ्यावरील आनंदच आम्हाला महत्वाचा वाटतो.
- प्राची कुलकर्णी (पालक)