सोमवारपासून राज्यातील बाजारपेठा गजबजणार; मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांसोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 01:58 AM2021-04-09T01:58:45+5:302021-04-09T07:27:23+5:30

ब्रेक द चेनच्या निर्णयात बदल करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली असून, सरकार सकारात्मक आहे.

Markets in the state will be open from Monday | सोमवारपासून राज्यातील बाजारपेठा गजबजणार; मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांसोबत चर्चा

सोमवारपासून राज्यातील बाजारपेठा गजबजणार; मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांसोबत चर्चा

Next

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत सोमवारपासून दुकाने सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने घेतला आहे, अशी माहिती ललित गांधी यांनी प्रसार माध्यमांना दिली. ब्रेक द चेनच्या निर्णयात बदल करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली असून, सरकार सकारात्मक आहे. त्यांनी २ दिवसांचा वेळ मागितला असून, त्यांच्या आश्वासनानुसार ९ तारखेला दुकान सुरु करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चरतर्फे गुरुवारी ‘ब्रेक द चेन’ व ‘व्यापार बंद’वर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, व्यापारी सभासद यांची चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली. 

सोमवारपासून संपूर्ण राज्यातील व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. गेले दिवस आपण सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. तसेच सरकारच्या संपर्क करून आहोत. सर्वांच्या भुमिका मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत, असे देखील गांधी यांनी नमूद केले. 
 

Read in English

Web Title: Markets in the state will be open from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.