लग्नातील फसवणूक

By admin | Published: March 8, 2015 02:10 AM2015-03-08T02:10:43+5:302015-03-08T02:10:43+5:30

नेहाने जर पोलिसात तक्र ार केली तर कंगनाला कायमचे सासर सोडावे लागेल असा तिने पवित्रा घेतला. आत्याला काहीच सुचेना. तिने नेहाच्या वडिलांना बोलावून घेतले. सर्वच मंडळी काळजीत पडली.

Marriage fraud | लग्नातील फसवणूक

लग्नातील फसवणूक

Next

नेहाने जर पोलिसात तक्र ार केली तर कंगनाला कायमचे सासर सोडावे लागेल असा तिने पवित्रा घेतला. आत्याला काहीच सुचेना. तिने नेहाच्या वडिलांना बोलावून घेतले. सर्वच मंडळी काळजीत पडली. त्यांनी काही कायदेशीर कारवाई केली असती तर कंगनाचे भविष्य धोक्यात होते. त्यासाठी आत्याची तयारी नव्हती. संतोषला व त्याच्या आईला पोलिसांचा ससेमिरा नको होता. कारण हे लग्न जमवण्यात त्यांचा पुढाकार होता. शिवाय घराण्याची अब्रू जाईल असेही वाटत होते.

आईविना नेहाला आत्याने वाढवले होते. नेहाचे वडील फिरतीच्या नोकरीवर असल्याने त्यांना नेहाला स्वत:सोबत ठेवता येत नव्हते. आत्या प्रेमळ होती, ती नेहाला व्यवस्थित सांभाळत होती. कोठेच काही तक्रार नव्हती. यथावकाश नेहा १२वी पास झाली. तिला जास्त शिकवण्याची घरच्यांची ऐपत नव्हती, तसेच ती लग्नायोग्य झाली होती. तरुण मुलगी जास्त दिवस घरी नको म्हणून आत्याने तिच्या लग्नाचा तगादा लावला. नेहाला त्याबद्दल विचारलेच नाही. तसेही नेहा अबोलच होती. तिला परिस्थितीची जाणीव असल्याने ती संकोचत असे.तिने पुढे काही प्रशिक्षण घेण्याकडेही लक्ष दिले नाही. वडिलांना नेहाबद्दल खूप जवळीक अथवा काळजीही नव्हती. त्यातच आत्याच्या मुलीचे कंगनाचे लग्न झाले. आता आत्याला नेहाच्या भविष्याची काळजी लागली. ती सर्वांना नेहाला स्थळे बघण्यासाठी आग्रह धरू लागली.
कंगनाच्या पतीने संतोषने व सासूने नेहासाठी करणचे स्थळ सुचवले. करणची आई कंगनाच्या सासूच्या दूरच्या नात्यात होती. घर सधन होते. करणला व्यवस्थित नोकरी होती. लग्न ठरले. साखरपुडा घाईनेच झाला. नेहा-करण दोन वेळा फिरायला बाहेर गेले होते. सर्वांसमोर अदबीने वागणारा करण बाहेर विचित्र वागत असे. दोघांची विशेष ओळख झाली नव्हती तरी तिच्याशी अति जवळीक साधण्याचा प्रयत्न तो करत होता. त्यातही त्याचा धसमुसळेपणा असे. नेहा अस्वस्थ होत असे पण कोणाकडे सांगावे असे तिला वाटे. तिने आत्याशी बोलायचा प्रयत्न केला पण आत्याने हसण्यावारी नेले. नेहा या लग्नाच्या कल्पनेने घाबरून गेली. तिचे चांगल्या घरी लग्न ठरल्याच्या आनंदात तिची अस्वस्थता कोणाच्याच ध्यानी आली नाही. तिचे करणशी लग्न झाले त्याच रात्री नेहा आणि करण मधुचंद्रासाठी रवाना झाले.
आता नेहाचे दु:स्वप्न सुरू झाले. सुखी संसाराची तिची स्वप्ने पार धुुळीला मिळाली. दिवसा करण नीट वागायचा. रात्री त्याचे वागणे बदलून जायचे. प्रणयाच्या नावावर तो नेहाला शारीरिक इजा करीत असे. तो नेहाच्या शरीरावर ब्लेडने जखमा करी. ती घाबरलेली बघून, तिच्या वेदना बघून हसत असे. त्यातच त्याला विकृत आनंद वाटत होता. दिवसा आणि रात्रीच्या करणमध्ये खूप फरक होता. जशा काही त्याच्यात एकाच वेळी दोन व्यक्ती सामावलेल्या होत्या. करण प्रत्यक्षात एक मानसिक रुण होता. नेहा त्याच्या भीतीने मधुचंद्राच्या काळातच आजारी पडली. तिला ताप भरला. अशा परिस्थितीत ते वेळेआधी घरी परतले.
त्यानंतर रितीप्रमाणे नेहा माहेरी आली. ती फारच भेदरलेली दिसत होती. अजूनच अबोल झाली. तापात पडून राहिली होती. नेहा खूप अशक्त झाली होती. डोळ्यांतून सतत पाणी गळत होते. या काळात तिला भेटायला येण्याचे करणने टाळले. आत्याला आता काळजी वाटू लागली. अशातच एकदा आंघोळ झाल्यानंतर आत्या नेहाला कपडे घालण्यासाठी मदत करत होती. तिला नेहाच्या पाठीवर कापल्याच्या खुणा दिसल्या. तिने नीट बघितल्यावर तिच्या इतर भागांवरही तिला जखमा आढळल्या. नेहाला तिने खोदून खोदून विचारले तर नेहाचा बांधच फुटला. हळूहळू नेहाने तिचा करणच्या सहवासातील सर्व अनुभव सांगितला. आत्या घाबरून हताश झाली. दोघींनी स्वत:ला घरात कोंडून घेतले. त्यातच नेहाला भेटायला कंगना आली. ती तिच्या वैवाहिक जीवनात आनंदात होती. घरातले वातावरण बघून तिला काळजी वाटली. तिने संतोषला बोलावून घेतले. संतोषने सर्व ऐकून घेतले; पण त्याने करणविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यास विरोध केला. काहीतरी मार्ग काढू असा मोघम इशारा देऊन तो कंगनाला घेऊन निघून गेला. नेहाचे वडील बाहेरगावी गेले होते. त्यांचा मामा पोलिसात होता पण तोही यात्रेला गेला होता. आत्या हतबल होऊन बसून राहिली.
तिसऱ्या दिवशी संतोषची आई या घरी आली व तिने नेहाला सासरी पाठवण्यास सांगितले. आत्याने नकार दिला. यावर त्या बार्इंनी भांडणच काढले. ‘‘रोगी मुलगी करणच्या गळ्यात बांधली,’’ असा तिचा आरोप होता. नेहाच्या सासरच्यांना पैशाची घमेंड होतीच. कायद्याचा धाकही नव्हता. ‘‘नेहा लग्ना आधीपासूनच रोगी होती; पण तिला मानसिक आजारही होता व ती स्वत:ला जखमा करून घेत होती,’’ असाही तिच्या सासरच्यांनी आरोप केला. यात्रेला गेलेला मामा लगेच परत आला. त्याने हे प्रकरण हाती घेतले.

लग्नच फसवून झाले असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने नेहाची या लग्नातून सुटका झाली. मामाच्या प्रोत्साहनाने नेहाने शिक्षण सुरू केले. मात्र या अनुभवातून बाहेर पडण्यास नेहाला अनेक वर्षे लागली.

अ‍ॅड. नीलिमा कानेटकर

Web Title: Marriage fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.