लग्नसराईच्या हंगामाचा एसटीला अहेर
By admin | Published: May 26, 2016 01:23 AM2016-05-26T01:23:54+5:302016-05-26T01:23:54+5:30
उत्पन्नात मोठी भर पडावी यासाठी एसटी महामंडळाने मोसमातील लग्नाच्या शेवटच्या मुहूर्ताचा फायदा घेत जादा वाहतूक करण्याचा निर्णय घेतला होता. ३0 एप्रिल आणि
मुंबई : उत्पन्नात मोठी भर पडावी यासाठी एसटी महामंडळाने मोसमातील लग्नाच्या शेवटच्या मुहूर्ताचा फायदा घेत जादा वाहतूक करण्याचा निर्णय घेतला होता. ३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी असलेल्या मुहूर्ताच्या दिवशी एसटी महामंडळाने
राज्यात जादा वाहतूक केल्याने एकूण
३९ कोटी ४0 लाखांचे उत्पन्न मिळविले
आहे.
एसटी महामंडळाने ३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवसांत असणाऱ्या लग्नसराईचा फायदा घेऊन १0 टक्के जादा वाहतूक केली. जवळपास १,७00 पेक्षा अधिक बस महामंडळाकडून सोडण्यात आल्या. ज्या मार्गांवर आरक्षण पूर्ण झाले आहे अशा मार्गांवर प्रवासी गर्दीचा अंदाज घेऊन एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे ३0 एप्रिल रोजी २0 कोटी रुपये तर १ मे रोजी सोडलेल्या जादा वाहतुकीतून १९ कोटी ४0 लाख रुपये उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे. एप्रिलपासून दर दिवशी महामंडळाला दुष्काळामुळे १७ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. मात्र लग्नसराईतल्या या दोन दिवसांत महामंडळाने चांगली कमाई केली. मागील वर्षातील एप्रिल महिन्याच्या ३0 तारखेला आणि १ मे या दोन दिवसांत महामंडळाला एकूण ३६ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यात ३ कोटी ४0 लाखांची अधिक भर पडली आहे. (प्रतिनिधी)
मुंबई प्रादेशिक विभाग आघाडीवर
सर्वात जास्त उत्पन्न मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे या मुंबई प्रादेशिक विभागातून मिळाली आहे. उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळाने अधिकाऱ्यांना अनेक सूचनाही केल्या होत्या. यात महत्त्वाची बाब म्हणजे जादा वाहतुकीच्या गाड्या सुस्थितीत व स्वच्छ राहतील, याची दक्षता घेतानाच आवश्यकतेनुसार जादा फेऱ्यांचे नियोजन आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्य बसस्थानकातून पहाटे आपापल्या गावी जाणाऱ्या (स्थानिक) जादा बसही उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
३0 एप्रिल रोजी २0 कोटी रुपये तर १ मे रोजी सोडलेल्या जादा वाहतुकीतून १९ कोटी ४0 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. एप्रिलपासून महामंडळाला दुष्काळामुळे प्रवासी घटल्याने रोज १७ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. लग्नसराईच्या विशेष गाड्यांमुळे मात्र चांगले उत्पन्न मिळाले.