चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:13 AM2018-04-17T01:13:13+5:302018-04-17T01:13:13+5:30
विवाहात कमी हुंडा दिला, मानपान दिला नाही तसेच चारित्र्याच्या संशयावरून पुणे येथील आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर असलेल्या पतीसह सासरकडील मंडळी शारीरिक मानसिक छळ करीत असल्याची फिर्याद सिडकोतील विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे़
नाशिक : विवाहात कमी हुंडा दिला, मानपान दिला नाही तसेच चारित्र्याच्या संशयावरून पुणे येथील आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर असलेल्या पतीसह सासरकडील मंडळी शारीरिक मानसिक छळ करीत असल्याची फिर्याद सिडकोतील विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे़ लीना संदीप जाधव (३५, रा़ ३०२, मोणिका क्लासिक हौसिंग सोसायटी, हरपळे वस्ती, हडपसह, सध्या राग़णेश चौक, सिडको) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २ मे २००५ रोजी त्यांचा विवाह संदीप जगन्नाथ जाधव यांच्यासोबत झाला़ यावेळी त्यांच्या वडिलांनी एक लाख ११ हजार रुपये हुंडा व अडीच तोळे सोने दिले होते़ तसेच अंगावर सात तोळ्याचे दागिने घालून थाटात विवाह लावून दिला़ विवाहानंतर वर्षभर सासरच्यांनी चांगली वागणूक दिली़ मात्र त्यानंतर लग्नात मानपान मिळाला नाही, चैनीच्या वस्तू दिल्या नाही, हुंडा कमी मिळाला, अशी कुरापत काढून शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले़ पतीच्या सरकारी नोकरीसाठी माहेरून पाच लाख घेऊन ये, तसेच चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करण्याचा प्रकार ४ आॅक्टोबर २०१७ पर्यंत सुरू होता़ सासरच्या त्रासास कंटाळलेल्या लीना जाधव यांनी पुणे येथील आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर असलेले पती संदीप जगन्नाथ जाधव, जगन्नाथ रामचंद्र जाधव (सासरे), शकुंतला रामचंद्र जाधव (सासू), प्रितम रविकांत जाधव व उज्ज्वला प्रवीण दुबे (नणंद)यांच्याविरोधात शारीरिक व मानसिक छळ तसेच मारहाणीची फिर्याद दिली आहे़