संपत्तीच्या वादातून जन्मदात्याने केला विवाहित मुलाचा खून
By admin | Published: August 24, 2016 09:02 PM2016-08-24T21:02:33+5:302016-08-24T21:02:33+5:30
संपत्तीच्या वादातून जन्मदात्याने आपल्या विवाहित मुलाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना शहरानजीकच्या सुटाळा खुर्द येथे बुधवारी भरदुपारी ४ वाजताचे सुमारास घडली.
ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 24 : संपत्तीच्या वादातून जन्मदात्याने आपल्या विवाहित मुलाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना शहरानजीकच्या सुटाळा खुर्द येथे बुधवारी भरदुपारी ४ वाजताचे सुमारास घडली. घटनेनंतर आरोपीनेच पोलिस स्टेशन गाठून खुनाची कबुली दिली. शहरानजीकच्या सुटाळा खुर्द येथील रहिवासी गोपाल वेरुळकर व त्यांचा मुलगा अरुण वेरुळकर यांच्यामध्ये शेती व संपत्तीच्या कारणावरुन नेहमी वाद होत असे. दरम्यान बुधवारी दुपारी अरुण वेरुळकर याने याच कारणावरुन वडिल गोपाल वेरुळकर यांच्याशी वाद घातला.
हा वाद विकोपाला जावून शिविगाळपर्यंत पोहोचला. दरम्यान यावेळी कुऱ्हाडीने लाकूड फोडत असताना गोपाल वेरुळकार यांच्या अंगावर मुलगा अरुण हा सब्बल घेवून अंगावर धावल्याने वडिल गोपाल वेरुळकर यांनी मुलगा अरुणच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. यामुळे अरुण वेरुळकर हा जागीच गतप्राण झाला. या घटनेनंतर गोपाल वेरुळकर यांनी स्वत:च खामगाव शहर पोलिस स्टेशन गाठून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार डी.डी.ढाकणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गाडे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी देशमुख, पोहेकाँ क ैलास चव्हाण, पोकाँ संदीप टाकसाळ आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व प्रेत्त उत्तरीय तपासणीसाठी खामगाव सामान्य रुग्णालयात आणले.
याप्रकरणी शहर गोपाल वेरुळकर व त्यांचा मुलगा प्रकाश वेरुळकर अशा दोघांविरुध्द कलम ३०२, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर ह्या करीत आहेत. पोलिसांनी गोपाल वेरुळकर यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतक अरुण हा विवाहित असून त्याचे पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.