सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:11 AM2018-08-30T01:11:38+5:302018-08-30T01:12:48+5:30

वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या प्रतीक्षा अभिषेक साळुंके (२५) या विवाहितेने पती व सासरच्यांच्या छळास कंटाळून मंगळवारी (दि़२८) सायंकाळी आत्महत्या केली़ या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेचा पती अभिषेक बापूराव साळुंके व सासरे बापूराव साळुंके (रा. वडाळा-पाथर्डी रोड) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

 Married husband sues his father-in-law | सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Next

नाशिक : वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या प्रतीक्षा अभिषेक साळुंके (२५) या विवाहितेने पती व सासरच्यांच्या छळास कंटाळून मंगळवारी (दि़२८) सायंकाळी आत्महत्या केली़ या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेचा पती अभिषेक बापूराव साळुंके व सासरे बापूराव साळुंके (रा. वडाळा-पाथर्डी रोड) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़  म्हसरूळ येथील वाढणे कॉलनीतील ड्रीम गणेशा अपार्टमेंटमधील दादाभाऊ देशमुख यांची मुलगी प्रतीक्षा हिचा विवाह गेल्यावर्षी अभिषेक साळुंके याच्याशी झाला होता. २७ नोव्हेंबर २०१७ च्या पंधरा दिवसांनंतर ते २८ आॅगस्ट २०१८ या कालावधीत प्रतीक्षा तिचा पती अभिषेक हा घरकामावरून वाद घालून शिवीगाळ करीत होता़ तसेच पतीचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याची माहिती प्रतीक्षाला मिळाल्याने ती खचली होती़ त्यातच पती अभिषेक हा नवीन प्लॉटच्या पैशांकरिता वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करीत होता़  अभिषेक व त्याच्या आई-वडिलांनी प्रतीक्षाच्या आईवर खोटा आळ घेऊन तिचा छळ सुरू केला होता़ या छळास कंटाळलेल्या प्रतीक्षा हिने सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली व यासाठी तिचा पती व सासू-सासऱ्यांनी प्रवृत्त केल्याची फिर्याद तिचा भाऊ नरेंद्र दादाभाऊ देशमुख याने इंदिारानगर पोलिसांत दिली आहे़

Web Title:  Married husband sues his father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.