सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By Admin | Published: October 16, 2016 10:57 PM2016-10-16T22:57:14+5:302016-10-16T23:56:25+5:30

पावणेदोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने घरगुती कारणावरून राहत्या घरातील छताच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

Married to suicide in India | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 16 -  पावणेदोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने घरगुती कारणावरून राहत्या घरातील छताच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बालाजीनगर परिसरातील महूनगर येथे रविवारी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. 

छाया संदेश गरबडे (२४, रा.महूनगर, बालाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, छाया हिच्या पतीचे महूनगर येथे घरापासून काही अंतरावर किराणा दुकान आहे. तिचे माहेर आणि सासर एकाच गल्लीमध्ये आहे. २५ डिसेंबर २०१४ रोजी छाया आणि संदेशचा विवाह झाला. त्यांना एक वर्षाचा रणवीर हा मुलगा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मात्र पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून सतत कुरबुर होत असे. चार दिवसांपूर्वी संदेशने परफ्युम खरेदी करून आणला होता. या परफ्युमवरून पती-पत्नीत वाद झाला होता. रविवारी सकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानात झाडझूड केल्यानंतर दुधाची बॅग घेऊन छाया  घरी गेली. त्यानंतर ती चहा आणणार होती. त्यानंतर तिची सासू दुकानात आली. तर दीर दुसºया खोलीत अभ्यास करीत बसला होता. सकाळी ९.१५ वाजले तरी छाया चहा घेऊन आली नाही म्हणून संदेश दुकानातून घरी गेला. यावेळी त्याने त्याच्या बेडरूमचा दरवाजा लोटला असता छताच्या लोंखडी हुकाला ओढणी बांधून छायाने गळफास घेतल्याचे त्यास दिसले. त्यानंतर त्याने आरडाओरड केल्याने त्याचा भाऊ आणि गल्लीतील लोक जमा झाले.
त्यांनी तिला तात्काळ फासावरून उतरवून प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी छायास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा याप्रकरणी विवाहितेच्या वडिल जगन्नाथ मगरे यांनी रात्री उशीरा जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  कार खरेदी करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावे, यासाठी  आरोपी पती, सासू,सासरे आणि दिर यांनी तिचा छळ केला.या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यावरुन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती  सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. कांबळे यांनी दिली.

Web Title: Married to suicide in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.