पुण्यात वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By admin | Published: October 6, 2016 05:21 PM2016-10-06T17:21:56+5:302016-10-06T17:21:56+5:30

डीएचएफएल या फायनान्स कंपनीमध्ये क्रेडीट मॅनेजर पदावर काम करणा-या एका विवाहीतेने तिच्या वरिष्ठाच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक

Married to suicide in Pune | पुण्यात वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुण्यात वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Next
>ऑनलाइन लोकमत
 
पुणे, दि. 06 - डीएचएफएल या फायनान्स कंपनीमध्ये क्रेडीट मॅनेजर पदावर काम करणा-या एका विवाहितेने तिच्या वरिष्ठाच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील वारज्यामध्ये घडली. या विवाहीतेच्या मोबाईलवर तिच्या वरिष्ठाने पाठवलेले अश्लिल मेसेज पतीने मोबाईलसह पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात तिने पतीला आपल्याला मानसिक त्रास होत असल्याने नोकरी सोडणार असल्याचे सांगितले होते. तब्बल एक महिन्यानंतर हे प्रकरण समोर आले असून वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अश्विनी महेंद्र पाटील (वय 32, रा. प्रियदर्शनी विहार, वारजे) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी सुरज बुंदेले (पुर्ण नाव पत्ता नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्र अशोक पाटील (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचे पती महेंद्र धनकवडी येथील एका खासगी संगणक कंपनीमध्ये नोकरी करतात. तर अश्विनी या डीएचएफएल कंपनीमध्ये क्रेडीट मॅनेजर म्हणून नोकरी करीत होत्या. आरोपी बुंदेले हा अश्विनी यांचा कंपनीतील वरिष्ठ आहे. 8 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महेंद्र कामावरुन घरी आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. त्यांनी बराच वेळ बेल वाजवली तरी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर पत्नीच्या मोबाईलवर अनेकदा फोन केल्यावर दरवाजा उघडला जात नाही म्हटल्यावर शेजारच्यांच्या मदतीने त्यांनी धक्का मारुन दरवाजा उघडला. 
त्यावेळी बेडरुममध्ये अश्विनी यांनी पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले. घाबरलेल्या महेंद्र यांनी तातडीने शेजारच्यांना बोलावत मृतदेह खाली उतरवला. दरम्यान, पोलिसांना संपर्क करण्यात आला. त्यावेळी बेडवरच पडलेला अश्विनी यांचा मोबाईल वाजत होता. या म्प्बाईलवर सुरज बुंदेले याचा फोन आलेला होता. हा फोन उचलत महेंद्र यांनी  ‘माझी अश्विनी गेली’ असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर वडील व सास-यांना फोन करुन घडलेला प्रकार कळवला. त्यानंतर पत्नीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये सुरज बुंदेलेने अश्विनी यांना वारंवार फोन करुन त्रास दिल्याचे समोर आले. तसेच त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत ‘मी पार्किंगमध्ये उभा आहे, दार उघड’ असे मेसेज वारंवार पाठवल्याचेही त्यांनी पाहिले. अश्विनी यांच्या मोबाईलवर आरोपीचे बरेच मिस्डकॉल होते.
बेडजवळ त्यांना अश्विनी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये  ‘मी अश्विनी महेंद्र पाटील स्वखुशीने फाशी घेत आहे, यात माझ्या घरच्यांचा, कुटुंबियांचा काही दोष नाही. हीच विनंती आहे की त्यांना कोणताच त्रास कोणीच देऊ नये’ असे लिहून ठेवलेले होते. महेंद्र यांनी ही चिठ्ठी आणि मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिला. ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या मुळ गावी जाऊन मृत्यूनंतरचे सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले. दु:खातून तसेच मानसिक धक्क्यामधून सावरलेल्या पाटील यांनी बुधवारी रात्री वारजे पोलिसांकडे जाऊन फिर्याद दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: Married to suicide in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.