‘सेकंड हॅन्ड’ वाहनांसाठी मारुती सुझुकी सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 03:34 AM2017-08-12T03:34:51+5:302017-08-12T03:35:14+5:30
सेकंडहॅन्ड वाहने घेताना अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. सेकंडहॅन्ड वाहन घेताना कारच्या स्थितीचा नेमका अंदाज बांधणे कठीण जाते. त्यामुळे सेकंडहॅन्ड वाहनांसाठी आता मारुती सुझुकी सरसावली आहे.
मुंबई : सेकंडहॅन्ड वाहने घेताना अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. सेकंडहॅन्ड वाहन घेताना कारच्या स्थितीचा नेमका अंदाज बांधणे कठीण जाते. त्यामुळे सेकंडहॅन्ड वाहनांसाठी आता मारुती सुझुकी सरसावली आहे. मारुतीने ‘ट्रू व्हॅल्यू’ ही नवी सेवा भारतभर सुरू केली आहे.
वांद्रे येथील ताज लॅन्ड एन्ड हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मारुती सुझुकी कंपनीने ‘ट्रू व्हॅल्यू’ परिचालनातील आमूलाग्र बदल घोषित केले. देशभरातील ट्रू व्हॅल्यू दालनांतील मारुती सुझुकी ब्रॅण्डच्या कोणत्याही पूर्व मालकीच्या गाड्यांची वैशिष्ट्ये ग्राहकांना एकाच छताखाली पाहता येणार आहेत. यासाठी सर्व दालने अत्याधुनिक डिजिटल यंत्रणेने सज्ज असणार आहेत. ग्राहकांना चारचाकी वाहनांची वॉरंटी आणि मोफत सेवा सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ केनिची आयुकावा म्हणाले की, नवीन वाहने विकत घेणाºया ग्राहकांसारखाच अनुभव सेकंडहॅन्ड वाहने विकत घेणाºया ग्राहकांनाही द्यायचा आहे. या वेळी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, मार्केटिंग व सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी संचालक आर. एस. कल्सी, मार्केटिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष तरुण गर्ग यांचीही उपस्थिती होती.
विविध प्रकारे वाहनांची तपासणी
३७६ चेक पॉइंट्सनुसार गाडीची तपासणी केली जाते. तपासणीनंतर, मारुती सुझुकीच्या सेवा केंद्रात ती गाडी नवनिर्मित केली जाते. काम पूर्ण झाल्यानंतर इंजिन, सस्पेन्शन, ब्रेक्स, इलेक्ट्रिकल, ट्रान्समिशन आणि स्टिअरिंग कन्ट्रोल तसेच, एक्सटिरीअर आणि इंटिरिअर या सहा निकषांवरुन गाडीचे परिक्षण केले जाते. सर्व तपासणीनंतर वाहनाला ट्रू व्हॅल्यू प्रमाणपत्र दिले जाते.