मनसेचा फुसका बार

By admin | Published: October 19, 2014 02:53 PM2014-10-19T14:53:00+5:302014-10-19T14:53:00+5:30

विधानसभा निवडणुकीत तिखट शब्दात विरोधकांवर हल्लाबोल करणा-या राज ठाकरे यांच्या मनसेने लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही सपाटून मार खाल्ला आहे.

Mascara Fuselage Bar | मनसेचा फुसका बार

मनसेचा फुसका बार

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १९ - विधानसभा निवडणुकीत तिखट शब्दात विरोधकांवर हल्लाबोल करणा-या राज ठाकरे यांच्या मनसेने लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही सपाटून मार खाल्ला आहे.  २००९ च्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांसह विधानसभेची पायरी चढणा-या मनसेला यंदाच्या निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, शिशीर शिंदे या नेत्यांचा यंदा दारुण पराभव झाला आहे. 
२००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करुन राज ठाकरे यांनी शिवसेनेला शह दिला. मराठीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी परप्रांतियावर हल्लाबोल केला व देशभरात ते चर्चेचा विषय ठरले. २००९ च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना तब्बल १३ जागांवर विजय मिळाला तर अनेक ठिकाणी मनसेमुळे शिवसेना - भाजप उमेदवारांचा पराभव झाला. त्यापाठोपाठ नाशिक महापालिकेत मनसेचा झेंडा फडकल्याने राज्याच्या राजकारणात मनसे महत्त्वाची भूमिका निभावेल असे दिसत होते. मात्र आक्रमक भाषण वगळता अन्य ठोस कोणताही मुद्दा नसल्याने मनसेची पिछेहाट झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत मोदीनामाचा जप करणा-या राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत मोदींना कडाडून विरोध केला.  मोदींच्या गुजराती अस्मितेवरुन मराठी अस्मितेचे राजकारण करु पाहणारे राज ठाकरे हे मतदारांना आकर्षित करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.  
२००९ च्या विधानसभेत मनसेने १४३ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी १३ आमदार निवडून आले होते तर एकूण मतांपैकी तब्बल ५.७१ टक्के मतं मनसेच्या वाट्याला आली होती. तर यंदाच्या निवडणुकीत २१९ जागा लढवणा-या मनसेला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. तर एकूण मतांपैकी मनसेला अवघी ३ टक्के मतंच मिळवता आली आहेत. विशेष बाब म्हणजे राज ठाकरेंची निकटवर्तीय समजले जाणारे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनादेखील पराभवाचा सामना करावा लागला. 

Web Title: Mascara Fuselage Bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.