उच्च शिक्षण समितीवर माशेलकर
By admin | Published: March 6, 2016 03:28 AM2016-03-06T03:28:01+5:302016-03-06T03:28:01+5:30
महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे आणि त्याअंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी टास्कफोर्सची स्थापना केल्यानंतर आता
मुंबई : महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे आणि त्याअंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी टास्कफोर्सची स्थापना केल्यानंतर आता या टास्कफोर्सला मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे या समितीचे अध्यक्ष असतील. या समितीचे उपाध्यक्ष जागतिक कीर्तीचे शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर असतील. याशिवाय समितीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. जे.बी. जोशी, मोहनदास पै, अजित रांगणेकर, नवशाद फोर्ब्स, सॅन्ड्रा श्रॉफ, संदीप वासलेकर हे सदस्य असतील. तर राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)