मशिदीत गणेशोत्सव

By admin | Published: September 18, 2015 02:57 AM2015-09-18T02:57:54+5:302015-09-18T02:57:54+5:30

येथील झुंझार चौकात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची गेल्या ३५ वर्षांची परंपरा न्यू गणेश तरुण मंडळाने

Masjid Ganesh Festival | मशिदीत गणेशोत्सव

मशिदीत गणेशोत्सव

Next

- प्रतापसिंह माने,  गोटखिंडी
गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुंझार चौकात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची गेल्या ३५ वर्षांची परंपरा न्यू गणेश तरुण मंडळाने आजही जपली आहे. यावर्षी इस्लामपूर विभागाच्या पोलीस उपविभागीय अधिकारी वैशाली शिंदे यांच्याहस्ते गुरुवारीगणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गेल्या ३५ वर्षांपूर्वी म्हणजे १९८० मध्ये येथील ज्येष्ठ जाणकरांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले; पण त्याकाळात अतिपाऊस असल्याने गणपतीची प्रतिष्ठापना कोठे करावयाची, हा प्रश्न निर्माण झाला. त्यावर हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित येऊन मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून प्रत्येकवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना मशिदीमध्ये करण्याची परंपरा जपली आहे. मुस्लिम बांधव दररोज एकत्रित येऊन गणपतीची आरती करतात, तर मुस्लिमांचा रोजा हिंदू बांधव करीत असतात. गणेशोत्सव काळात मुस्लिम बांधव मांसाहार करीत नाहीत. १९८२ मध्ये मोहरम व गणेशोत्सव एकाचवेळी आल्याने एकाच ठिकाणी श्री गणेशमूर्ती व पंजाची स्थापना करण्यात आली होती. येथील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित उत्सव साजरे करून गुण्या-गोविंदाने नांदत आहेत.
यंदा या न्यू गणेश मंडळाने झुंझार चौक ते अमृतेश्वर देवालयापर्यंत विद्युत रोषणाई केली आहे. गणेशोत्सव काळात दररोज सामाजिक, पौराणिक नाटिका सादर केल्या जातात. मंडळाने रक्तदान, वृक्षारोपणासारखे अनेक उपक्रम राबविले आहेत.

‘ईद’ला कुर्बानी नाही
यावर्षी गणेशोत्सव काळातच मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण आला आहे; पण येथील मुस्लिम बांधव ईदला फक्त नमाज पठण करणार आहेत. ‘कुर्बानी’ करणार नाहीत, असे मुस्लिम बांधवांनी सांगितले.

Web Title: Masjid Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.