अकलूजमध्ये पोलिसांवर सामूहिक हल्ला

By admin | Published: February 11, 2016 01:33 AM2016-02-11T01:33:38+5:302016-02-11T01:33:38+5:30

रात्रीच्या वेळी दरोडा प्रतिबंधक गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला करुन तीन पोलिसांना जखमी केल्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुतण्या सत्यशील मोहिते-

A massacre of police in Akluj | अकलूजमध्ये पोलिसांवर सामूहिक हल्ला

अकलूजमध्ये पोलिसांवर सामूहिक हल्ला

Next

पंढरपूर : रात्रीच्या वेळी दरोडा प्रतिबंधक गस्तीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला करुन तीन पोलिसांना जखमी केल्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुतण्या सत्यशील मोहिते-पाटीलसह १० जणांना अटक करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री अकलूजमध्ये घडला. दरम्यान सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता सर्वाना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री एकच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम विष्णु कोरके हे दरोडा प्रतिबंधासाठी गस्त घालत असताना स्मृतीभवन (शंकरनगर) समोर बरेच लोक रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांना काठी, ऊस व हाताने मारहाण करत असल्याची माहिती त्यांना फोनवरुन मिळाली. त्यावरून कोरके हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मारहाण करणाऱ्या तरुणांना मज्जाव केला असता आकाश गवळी व दीपक दत्तात्रय गायकवाड यांनी कोरके, पोलीस शिपाई इंगोले आणि चौगुले यांना काठी, ऊस व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी कोरकेंसह सहकाऱ्यांच्या गालावर, हातावर, पाठीवर व पायावर मुका मार लागला.
या सर्व गोंधळात फौजदार गोसावी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तिरूपती काकडे, पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे व इतर कर्मचाऱ्यांना सदर मारहाणीची मोबाईलवरून कल्पना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी तिरूपती काकडे व पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. (प्रतिनिधी)

Web Title: A massacre of police in Akluj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.