मराठवाडयात मुसळधार पाऊस, मन्याड नदीला पूर ( फोटो स्टोरी)

By admin | Published: October 1, 2016 05:58 PM2016-10-01T17:58:45+5:302016-10-01T17:58:45+5:30

मराठवाडयात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. लातूर जिल्हयातील मुसळधार पावसाचा शेजारच्या नांदेड जिल्ह्याला फटका बसला आहे.

Massive rain in Marathwada, flood to Maniyad river (photo story) | मराठवाडयात मुसळधार पाऊस, मन्याड नदीला पूर ( फोटो स्टोरी)

मराठवाडयात मुसळधार पाऊस, मन्याड नदीला पूर ( फोटो स्टोरी)

Next

 ऑनलाइन लोकमत 

नांदेड, दि. १ - ऑनलाइन लोकमत 
नांदेड, दि. १ - मराठवाडयात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. लातूर जिल्हयातील मुसळधार पावसाचा शेजारच्या नांदेड जिल्ह्याला फटका बसला आहे. मुसळधार पाऊस आणि मांजरा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे मन्याड नदीला पूर आला आहे. 
मन्याड नदीचे पाणी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील फुलवळ नदीला जाऊन मिळते. त्यामुळे फुलवळ नदीलाही पूर आला आहे. फुलवळ नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. 
 
मराठवाडा रेन अपडेट 
डोंगरगाव इथे एका शेतात १३ लोक अडकले,प्रशासनाकडून हेलिकॉप्टर पाठवण्याची सरकारला विनंती,अडकलेले सर्वजण सुखरूप. 
 
नांदेडमध्ये देगलूर शहरातील फुले नगर भागातील 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यू, संदेश गणेश दांडेकर, प्रतिक मरीबा तलदवारे सकरगा येथील डोहात बुडून मृत्यू.
 
नांदेडमध्ये १४ वर्षांच्या सुनिल शेषेराव हंबर्डे या मुलाचा वीज पडून मृत्यू झाला. नायगांव तालुक्यातील हुस्सा येथील घटना.
 
 
 

Web Title: Massive rain in Marathwada, flood to Maniyad river (photo story)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.