महाआरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद

By admin | Published: June 19, 2016 03:34 AM2016-06-19T03:34:37+5:302016-06-19T03:34:37+5:30

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी महिला आणि मुलांसाठी आयोजित नि:शुल्क महाआरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Massive response to the medical camp | महाआरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद

महाआरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद

Next

नागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी महिला आणि मुलांसाठी आयोजित नि:शुल्क महाआरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
लोकमत आणि जैन सहेली मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ. दंदे फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात ८३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. बुटीबोरी येथील श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड वेल्फेअर सेंटर, जैन सहेली मंडळाच्या सभागृहात आयोजित या शिबिराचे सकाळी उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कृपाल तुमाने, प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लाकडावाला, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन खासदार विजय दर्डा, माजी मंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. दंदे फाऊंडेशनचे डॉ. पिनाक दंदे व जैन सहेली मंडळाच्या अध्यक्ष माधुरी बोरा उपस्थित होत्या. प्रास्ताविक लोकमतचे सहायक संपादक गजानन जानभोर यांनी केले. (प्रतिनिधी)

गरजू रुग्णांना मोफत औषधे वितरित करण्यात आली. याप्रसंगी शस्त्रक्रियेसाठी नोंद झालेल्या ६१ रुग्णांवर लवकरच शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी इस्पितळात पुढील उपचारासाठी सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Web Title: Massive response to the medical camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.