मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू

By admin | Published: June 28, 2017 01:35 PM2017-06-28T13:35:59+5:302017-06-28T14:17:45+5:30

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

Mastafa Dosa death convict in the Mumbai serial bomb blast | मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू

Next
जमीर काझी / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 -  १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे मंगळवारी रात्री उशीरा त्याला जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी अतितणाव आणि छातीतील संसर्गामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी दिली होती. 
 
यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मुस्तफा डोसाचा मृत्यू झाल्याची माहिती दुपारी समोर आली. 
 
‘डोसा, फिरोजला फाशीचीच शिक्षा द्या’ सीबीआयची मागणी
दरम्यान, १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले मुस्तफा डोसा व फिरोज खान यांना याच प्रकरणी फाशी चढविण्यात आलेल्या याकुब मेमनप्रमाणे फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी मंगळवारी सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला केली होती. या बॉम्बस्फोटात या दोघांची भूमिका मेमनप्रमाणे महत्त्वाची आहे, असा युक्तिवाद सीबीआयने केला.
 

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी ‘केस बी’ मध्ये विशेष न्यायालयाने मुस्तफा डोसा व फिरोज खानला मंगळवारी दोषी ठरवले. साखळी बॉम्बस्फोटासाठी तयार केलेल्या चार पथकांपैकी एका पथकाचा मुस्तफा डोसा म्होरक्या असल्याचा सीबीआयचा दावा विशेष न्यायालयाने मान्य केला. तसेच फिरोज खाननेही या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. याचाच आधार घेत सीबीआयने या दोघांचीही बॉम्बस्फोटातील भूमिका याच प्रकरणी फाशी सुनावलेल्या याकूब मेमन इतकीच महत्त्वाची असल्याचा दावा विशेष न्यायालयात केला.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट

12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला.
 

 

Web Title: Mastafa Dosa death convict in the Mumbai serial bomb blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.