महादेव मंदिरात नवजात बाळास ठेऊन माता फरार
By admin | Published: January 14, 2017 04:53 PM2017-01-14T16:53:20+5:302017-01-14T16:53:20+5:30
नुकत्याच जन्मलेल्या एका नवजात बाळास गावातील महादेवाच्या मंदिरात ठेऊन माता फरार झाल्याची घटना उघडकीस आली.
Next
ऑनलाइन लोकमत
बेलकुंड, दि. 14 - नुकत्याच जन्मलेल्या एका नवजात बाळास गावातील महादेवाच्या मंदिरात ठेऊन माता फरार झाल्याची घटना उघडकीस आली. बेलकुंड (ता. औसा, जि. लातूर) येथे हा प्रकार घडला. संक्रांतीच्या सणादिवशी उघडकीस आलेल्या या घटनेने मुलाला पाहण्यासाठी गावक-यांनी गर्दी केली होती. पहाटेच्या अत्यंत कडाक्याच्या थंडीतही ते मूल जिवंत राहील्याने देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय अनुभवायला आला.
शुक्रवार दि. १४ जानेवारी रोजी गावातील जीर्ण असलेल्या महादेवाच्या मंदिरात सकाळी ७ वाजता साधारणतः ४ ते ५ तासापूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. हा आवाज ऐकूण मंदिरा शेजारी राहत असलेल्या गावकऱ्यांनी मंदिरात धाव घेतली. पाहीले सर केली ओढ्याच्या पाठी मागे बोरिचे कातडे टाकलेले पुरूष जातीचे गोंडस अर्भक आढळून आले या घटनेची माहिती तात्काळ पोलिस ठाणे व प्रा. आ. केंद्राला दिली असता पोलिस रूग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले.
डॉ. राजहंस यांनी त्या नवजात शिशुवर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी लातूर जिल्हा रूग्णाल़ात हलविले. जिव घेण्या थंडीत ही ते नवजात अर्भक जिवंत राहीले सर्वांना वाटले व मकरसंक्रांतीच्या दिवशी देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यक्ष अनुभव बेलकुंड करांनी अनुभवला.