डबेवाल्यांसाठीही माथाडी कायदा - मुंडे
By admin | Published: May 10, 2014 01:39 AM2014-05-10T01:39:38+5:302014-05-10T01:39:38+5:30
महायुतीची सत्ता आल्यास मुंबईतील डबेवाल्यांनाही माथाडी कामगार कायद्या लागू करण्यात येईल, अशी घोषणा भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी शुक्रवारी केली.
मुंबई : महायुतीची सत्ता आल्यास मुंबईतील डबेवाल्यांनाही माथाडी कामगार कायद्या लागू करण्यात येईल, अशी घोषणा भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी शुक्रवारी केली. दादर येथील महापालिका क्रीडांगणात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील डबेवाल्यांच्या मेळायात ते बोलत होते़ यावेळी शिवसेना नेते आ. सुभाष देसाई, आ.विनायक मेटे, महादेव जानकर उपस्थित होते. मुंडे म्हणाले की, राज्यात सत्ता आल्यास डब्बावाल्यांसाठी माथाडी कामगार कायदा लागू करण्याची तसेच त्यांच्या घरांसाठी वसाहत उभारण्याची घोषणा केली. मराठा आरक्षणाबद्दल बोलताना मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाला माझा आणि छगन भुजबळांचा विरोध असल्याचा दावा केला जातो. मात्र, राज्य सरकारची इच्छा नसल्यामुळेच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकला नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. उलट येत्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरण्यात येईल, असे मुंडे म्हणाले. सुभाष देसाई म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने राणे समिती नेमली. मात्र, या समितीचा अहवाल अद्याप जनतेसमोर आलेला नाही. (प्र्रतिनिधी)
च्मावळ येथील शेतकर्यांवरचा गोळीबार अनावश्यक असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इशा-यावरुन हा गोळीबार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला.