‘ऊसभावाचे गणित शेट्टींनी केंद्राला समजावून सांगावे’
By admin | Published: November 2, 2016 04:54 AM2016-11-02T04:54:02+5:302016-11-02T04:54:02+5:30
भाजपा-शिवसेना सरकारचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी उसाला ३२०० रुपये भाव देण्याचे गणित केंद्र सरकारला समजावून सांगावे.
शिर्डी : भाजपा-शिवसेना सरकारचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी उसाला ३२०० रुपये भाव देण्याचे गणित केंद्र सरकारला समजावून सांगावे. त्याचप्रमाणे ऊस दर आणि साखर विक्रीतील तफावत भरुन काढण्यासाठी तसेच एफआरपी देण्यासाठी मागील दोन वर्ष कारखान्यांना केंद्राकडून घ्यावे लागलेले कर्ज अनुदानात रुपांतरित करण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
विखे पाटील म्हणाले की, मागील दोन वर्षे तोटा सहन करुन राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे भाव दिला आहे. यासाठी केंद्र सरकारकडून शून्य टक्के व्याजदराने कर्जही काढावे लागले.
साखर उद्योग अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत असताना केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्यांसाठी स्थैर्य निधी उभारण्याची गरज असताना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ३२०० रूपये भाव देण्याचे समीकरण कोणत्या आधारे मांडत आहेत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सरकारचा दावा फसवा!
दोन वर्षांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा राज्य सरकारचा दावा फसवा असल्याची टीकाही विखे यांनी केली. (प्रतिनिधी)