पर्यटन हंगामासाठी माथेरानकर सज्ज

By Admin | Published: November 2, 2016 02:14 AM2016-11-02T02:14:19+5:302016-11-02T02:14:19+5:30

पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पर्यटन हंगाम चालू होणार आहे.

Matheraner ready for the tourist season | पर्यटन हंगामासाठी माथेरानकर सज्ज

पर्यटन हंगामासाठी माथेरानकर सज्ज

googlenewsNext


नेरळ : पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पर्यटन हंगाम चालू होणार आहे. त्यामुळे माथेरानमधील छोटे मोठे स्थानिक व्यावसायिक तसेच हॉटेलधारक पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.
नुकताच पावसाळा संपला असल्याने येथील वनराई हिरवीगार झाली असून, जणू पर्यटकांच्या स्वागतासाठी आतूर झालेली आहे. माथेरानच्या चारी बाजूच्या पायथ्याजवळील लहान-मोठ्या टेकड्या हिरव्यागार शालूने सजल्याने निसर्गाची पर्वणी ठरली आहे. हिवाळा चालू झाल्याने गुलाबी थंडीला सुरुवात ही येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागताची सुरुवात असणार आहे.
माथेरानमधील छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी आपआपली दुकाने सजवण्यास सुरुवात केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रोशणाई, आकाशकंदील, डेकोरेशन करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांना दिवाळीची सुटी आहे. त्यामुळे दिवाळीनंतरचा हा पहिलाच पर्यटन हंगाम आहे. माथेरानमधील पुढील आठ माहिन्यांची आर्थिक गणिते या हंगामावर अवलंबून असतात. त्यामुळे स्थानिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवली आहे.
स्थानिक व्यावसायिक तसेच हॉटेलधारकांकडून पर्यटकांना उत्तम प्रकारे सेवा कशी देण्यात येईल, याकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. सध्या हॉटेल तसेच कॉटेजमध्ये आॅनलाइन बुकिंगची मोठ्या प्रमाणात चौकशी चालू आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा पर्यटकांची संख्या वाढेल आणि हंगामात चांगला व्यवसाय होईल, असा विश्वास स्थानिक व्यापाऱ्यांना आहे.
(वार्ताहर)
>घोड्यांसाठी पार्किंग
माथेरानची मिनीट्रेन सध्या बंद आहे. त्यामुळे पर्यटकांना शटल सेवेचा आधार घ्यावा लागतो. मात्र शटर सेवा निम्म्या मार्गासाठीच उपयोगी असल्याने पुढील प्रवास पायी अथवा घोडेस्वारीने करावा लागतो.
अश्वपाल संघटनेने घोड्यांना उभे करण्यासाठी माथेरान नगर परिषदेकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेकदा केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास अश्वपालांची समस्या दूर होईल. पर्यटन हंगामात अधिकाधिक फायदा होईल, असे स्थानिक अश्वपालांचे म्हणणे आहे.

Web Title: Matheraner ready for the tourist season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.