माथेरानचा डेंजरपाथ

By admin | Published: June 8, 2017 02:59 AM2017-06-08T02:59:35+5:302017-06-08T02:59:35+5:30

पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळे भुरळ घालतात तर कोणाला माथेरानमधील घोडेस्वारी आवडते

Matheran's Danger Path | माथेरानचा डेंजरपाथ

माथेरानचा डेंजरपाथ

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : माथेरानचे निसर्ग वैभव सर्वत्र सामावलेय. येणाऱ्या पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळे भुरळ घालतात तर कोणाला माथेरानमधील घोडेस्वारी आवडते. काहींना येथील नीरव शांतता आणि गर्द झाडी आवडते. माथेरानचे वैशिष्ट्य दाट जंगलातून तर कधी दरीच्या कडेने जाणाऱ्या पायवाटांमध्ये सामावले आहे. अशीच दरीच्या टोकावरून जाणारी लांबलचक पायवाट म्हणजे डेंजरपाथ. नावाप्रमाणे हा रस्ता आहे. ही पायवाट म्हणजे माथेरानच्या निसर्गाचे मनमोहक रूप आहे. पर्यटकांना याची माहिती देणारी व्यवस्था नसल्याने पर्यटक यापासून ते अनभिज्ञ राहतात.
माथेरान येथील शार्लोट लेकच्या जवळ पश्चिमेला लॉर्ड पॉइंट आहे. त्या लॉर्ड पॉइंटच्या बाजूने एक पायवाट जाते. एका बाजूला दाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी यामुळे या मार्गाला डेंजरपाथ हे नाव पडले. ब्रिटिश काळात डॉ. जे. पी. बॅरी यांनी या मार्गाला हे नाव दिले. लॉर्ड पॉइंटकडून निघताना अगदी छोटी दिसणारी पायवाट पुढे पुढे अगदी निमुळती होत जाते. जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये या मार्गाचे अस्तित्व धोक्यात आले. लॉर्ड पॉइंट ते बेलव्हेंडर पॉइंटपर्यंत जाणारी ही पायवाट आता फाउंटन लॉजच्या मागील बाजूस खंडित झाली आहे. आता ही वाट खंडित झाली असली तरी डेंजरपाथचा रु बाब मात्र तोच आहे. लॉर्ड पॉइंटकडून निघाल्यास डेंजर पाथच्या उजव्या बाजूस प्रबळगड तर समोर वनट्री हिल पॉइंटचे दर्शन होते. दरीच्या पायथ्याला मोरबे धरणाचे बॅक वॉटर दृष्टीस पडते, तर डाव्या बाजूला माथेरानची समृद्ध वनसंपदा आपली सोबत करते. माथेरानच्या निसर्गाची ही विविध रूपे माथेरानचे पर्यटन समृद्ध करतात. त्याची ओळख पर्यटकांना करून देण्याची गरज आहे.
माथेरानच्या वारसा स्थळांच्या यादीत डेंजरपाथचा समावेश
माथेरान नगरपरिषदेने जी निसर्ग आणि मानवनिर्मित वारसा स्थळांची यादी बनविली आहे त्यामध्ये डेंजर पाथचा समावेश आहे. ब्रिटिश काळात डॉ. जे. पी. बॅरी यांनी या पायवाटेला हे नाव दिले असून लहान मुलांनी या वाटेवर जाणे धोकादायक आहे असे या हेरिटेज मॅन्युअलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Matheran's Danger Path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.