माथेरानचे इंजिन दार्जिलिंगमध्येही घसरले

By admin | Published: January 12, 2017 04:36 AM2017-01-12T04:36:16+5:302017-01-12T04:36:16+5:30

माथेरानची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिनी ट्रेनचे डबे घसरल्याच्या घटना नेरळ ते माथेरानमध्ये घडल्यानंतर

Matheran's engine also collapsed in Darjeeling | माथेरानचे इंजिन दार्जिलिंगमध्येही घसरले

माथेरानचे इंजिन दार्जिलिंगमध्येही घसरले

Next

मुंबई : माथेरानची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिनी ट्रेनचे डबे घसरल्याच्या घटना नेरळ ते माथेरानमध्ये घडल्यानंतर, या ट्रेनचे इंजिन दार्जिलिंगमध्ये पाठवण्यात आले. मात्र, दार्जिलिंगमध्ये छोट्या ट्रेनच्या सेवेत गेलेले हे इंजिन आणि दोन डबे घसरल्याची घटना मंगळवारी घडली. त्यामुळे या तांत्रिक बाबीचा शोध मध्य रेल्वेकडून घेतला जात आहे.
२0१६ मधील मे महिन्यात माथेरान ट्रेनचे इंजिन व डबे घसरण्याच्या दोन घटना घडल्या. या घटनेनंतर सुरक्षेचे उपाय योजल्याशिवाय मिनी ट्रेन सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ट्रेनच्या इंजिनाला एअर ब्रेक प्रणाली, माथेरानच्या घाट परिसरात संरक्षक भिंत इत्यादी उपाययोजना करण्याच्या सूचना रेल्वेमंत्र्यांनी केल्या. त्यानुसार, त्याचा आढावा घेतल्यानंतर, रेल्वेमंत्रालयाने सुरक्षेसाठी ६ कोटींपेक्षा जास्त निधीही मंजूर केला. त्यामुळे ही ट्रेन सुरू होण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. तत्पूर्वी मिनी ट्रेनच्या इंजिनाला एअर ब्रेक नसल्याने, ती माथेरानमध्ये चालविणे धोकादायक असल्याचे समोर आले. त्यामुळे
एअर ब्रेक बसवण्यासाठी इंजिन दार्जिलिंगमध्ये पाठवण्यात आले. मात्र, हेच इंजिन जोडून दार्जिलिंगमध्ये दोन डब्यांची ट्रेन चालवण्यात आली असता ट्रेन घसरली. या घटनेमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात
असला, तरी त्याची गंभीर दखल रेल्वेकडून घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
कानपूर प्रकरणात रेल्वे अधिकाऱ्याची बदली
कानपूर येथे एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची घटना नुकतीच घडली होती आणि यात शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. या ट्रेनच्या डब्यांची देखभाल-दुरुस्ती ही लोअर परेल येथील कारखान्यात झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार, सखोल चौकशीही केली जात होती. या प्रकरणात कारखान्याच्या व्यवस्थापकाची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Matheran's engine also collapsed in Darjeeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.