माथेरानच्या मिनी ट्रेनला पावसाळ्यानंतरचा मुहूर्त?

By admin | Published: May 21, 2016 05:29 AM2016-05-21T05:29:31+5:302016-05-21T05:29:31+5:30

पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली माथेरानची मिनी ट्रेन गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेकडून बंद ठेवण्यात आली आहे.

Matheran's mini train marching after the monsoon? | माथेरानच्या मिनी ट्रेनला पावसाळ्यानंतरचा मुहूर्त?

माथेरानच्या मिनी ट्रेनला पावसाळ्यानंतरचा मुहूर्त?

Next


मुंबई : पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली माथेरानची मिनी ट्रेन गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेकडून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वेकडून सुरक्षेचे उपाय योजण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने काही उपाय सुचविले असून त्याची अंमलबजावणी रेल्वेकडून केली जाणार आहे.
दरम्यान, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आमच्याकडून प्रथम अमन लॉज ते माथेरान ट्रेन सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेन सेवा बंद होणार नाही. सेवा सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडून तीन लोको आणि एअर ब्रेकसह दहा कोचेस तयार केले जात आहेत. त्याचप्रमाणे माथेरानच्या घाट सेक्शनमध्ये ६५0 मीटरची काँक्रीटची भिंतही ट्रॅकच्या बाजूला बांधण्यात येईल. त्यामुळे दुर्घटना टाळता येणार आहे, असे स्पष्ट केले. मिनी ट्रेन घसरण्याच्या घटना घडल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने कामात हलगर्जी केल्याबद्दल एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यानंतर रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सुरक्षा उपाय योजण्यासाठी चार सदस्यांच्या एका स्वतंत्र समितीचीही स्थापना करण्यात आली. या समितीकडून नुकताच अहवाल सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले की, सुरक्षा समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालातून काही सूचना करण्यात आल्या आहेत.
यात महत्त्वाची बाब म्हणजे मिनी ट्रेनला एअर ब्रेक बसविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आतापर्यंत मिनी ट्रेनसाठी मॅन्युअली (मानवी) ब्रेकची हाताळणी होत होती. आता हे बदलून इंजीनमध्ये एअर ब्रेक प्रणाली बसविली जाणार आहे. यासह काही प्रक्रिया पार पाडून १0 जूननंतर म्हणजेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही दिवसांसाठी मिनी ट्रेन चालविण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र मिनी ट्रेनचे काम आणि अन्य प्रक्रिया पूर्ण न झाल्यास ती पावसाळ्यानंतरच चालविली जाऊ शकते. (प्रतिनिधी)
मिनी ट्रेन दोन वेळा रुळावरून घसरली. या ट्रेनला एअर ब्रेक असता तर ब्रेक लावून होणारा अपघात टाळताही आला असता. मात्र मॅन्युअली (मानवी पद्धतीने) ब्रेक हाताळणी होत असल्याने अपघात टाळता आले नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
>१२७ अंशांच्या वळणामुळे त्रास
मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी ट्रेन ज्या मार्गावर धावते त्या मार्गावर काही ठिकाणी मोठे वळसे आहेत.
एक तर सर्वात मोठा असा १२७ अंशातला वळणदार मार्ग असून तो मिनी ट्रेनसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्या मार्गावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

Web Title: Matheran's mini train marching after the monsoon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.