माथेरानच्या पॉइंट्सला गतवैभव मिळणार!
By admin | Published: April 6, 2017 02:48 AM2017-04-06T02:48:42+5:302017-04-06T02:48:42+5:30
निसर्गसौंदर्याने नटलेल्या माथेरानचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील रमणीय पॉइंट्स आहेत
माथेरान : निसर्गसौंदर्याने नटलेल्या माथेरानचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील रमणीय पॉइंट्स आहेत. मागील २६ जुलैच्या अतिवृष्टीमध्ये अनेक महत्त्वाच्या पॉइंट्सची वाताहात झाली होती. परिणामी, हे मुख्य पॉइंट्स नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने इतिहास जमा होतात की काय, ही भीती स्थानिकांसह पर्यटकांनाही होती. यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने, तसेच अन्य पक्षांतील मंडळींनी मुंबई महाराष्ट्र प्राधिकरण विकास मंडळाकडे या पॉइंट्सच्या सुशोभीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस या कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला आहे.
शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी,विद्यमान नगरसेवक तथा गटनेते प्रसाद सावंत, तसेच प्रभाग एक मधील नागरिक लक्ष्मण कदम यांच्या हस्ते विविध पॉइंट्सच्या दुरु स्ती कामाचे, तसेच महत्त्वाकांक्षी कामाचा शुभारंभ प्रभाग एक मधील इंदिरा गांधीनगर भागातील मायरा पॉइंटजवळ श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी एमएमआरडीएचे अधिकारी ढाणे व अन्य अधिकारी, तसेच नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर,विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माथेरानला नेहमीच विकासकामे करताना वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेमुळे आडकाठी होत असते. यासाठी महसूल व वनविभागाने मागील आठवड्यात एक विशेष बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे समजते. पुढील महिन्यात नेरळ -माथेरान घाट रस्त्याच्या कामास सुरु वात होणार आहे. यामध्ये वनखात्याची जेवढी जमीन विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहे. तितक्याच प्रमाणात महसूल जागेवर वनीकरण करण्याची अट सरकारच्या जी.आर.मध्ये नमूद केली असल्याने त्या अनुषंगाने एमएमआरडीए घाट रस्त्यांसाठी वनखात्याची एक हेक्टर जमीन वापरणार आहे. त्याच बदल्यात तेवढ्याच क्षेत्रात वनीकरण करण्यात येणार आहे.
तीन वर्षांपूर्वी माथेरानच्या संपूर्ण विकासकामांसाठी १२३ कोटी
रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यामध्ये नेरळ-माथेरान घाटासाठी २७ कोटी, दस्तुरी ते पांडे रस्त्यापर्यंतच्या मुख्य रस्त्यांसाठी ४९ कोटी आणि महत्त्वाच्या पॉइंट्सच्या सुशोभीकरणासाठी ४७ कोटी रु पये निधी मंजूर करण्यात आला होता; परंतु वनखात्याची अडचण येत असल्याने या कामास उशिराने सुरु वात होत आहे. मागील काळात या संपूर्ण प्रक्रि येत येथील महत्त्वाचे असणारे पॅनोरमा पॉइंट, मायरा,गार्बट व अन्य पॉइंट्सची नव्याने दुरु स्ती करून पर्यटकांच्या दिमतीला लवकरच सज्ज होणार असल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (वार्ताहर)
>येथील पर्यटनाचा मुख्य कणा हा एकमेव पर्यटक असल्याने त्यांना मुख्य पॉइंट्सची सैर करून निसर्गशोभा न्याहाळता यावी. येथील सर्वसामान्य मोलमजुरांचा याचनिमित्ताने व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. येथील पर्यटनक्र ांती घडावी, हे आमचे स्वप्न आहे. ते प्रत्यक्षपणे कृतीत साकारणार आहोत.
- प्रसाद सावंत, गटनेते,
माथेरान नगरपरिषद
माथेरानच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या सहा महिन्यांपासून घाटाचे काम सुरू व्हावे म्हणून पाठपुरावा केला होता. घाट रस्त्याचा एकूण २५ कोटी रु पयांचा प्रकल्प असून, सुरक्षित घाट रस्ता तयार झाल्यास पर्यटकांची संख्या वाढणार आहे.
- सुनील शिंदे,
प्राध्यापक, माथेरान
तीन वर्षांपूर्वी माथेरानच्या संपूर्ण विकासकामांसाठी १२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
नेरळ-माथेरान घाटासाठी २७ कोटी निधी मंजूर.