मातृतीर्थ जिल्ह्यात ‘बेटी बचाओ’ अभियानाला नख

By admin | Published: November 14, 2016 11:07 PM2016-11-14T23:07:15+5:302016-11-14T23:07:15+5:30

राष्ट्रीय जिजाऊं मॉ साहेबांच्या जन्माने पावन झालेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातच जिजाऊंच्या लेकींना जन्म घेण्यापूर्वीचमारून टाकण्यात येत असल्याचे भिषण वास्तव समोर आले आहे.

In the Mathrirthi district, look at the 'Beti Bachao' campaign | मातृतीर्थ जिल्ह्यात ‘बेटी बचाओ’ अभियानाला नख

मातृतीर्थ जिल्ह्यात ‘बेटी बचाओ’ अभियानाला नख

Next
>सुधीर चेके पाटील
चिखली, दि. 14 : राष्ट्रीय जिजाऊं मॉ साहेबांच्या जन्माने पावन झालेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातच जिजाऊंच्या लेकींना जन्म घेण्यापूर्वीचमारून टाकण्यात येत असल्याचे भिषण वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एकूण १२३ गावांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर ७० टक्यांऐवढा असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.
 जिल्ह्यातील १२३ गावांमधील ३९ गावे एकट्या चिखली तालुक्यातील असून मातृशक्तीचा उदोउदो करणाºया समस्त जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत लांछनास्पद आहे. तथापी स्त्री जन्मदर वाढावा यासाठी शासनाव्दारे राबविण्यात येणाºया
विविध योजना देखील जिल्ह्यात यशस्वीपणे राबविल्या जात नसल्याचे यातून निष्पन्न होत असून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची व्याप्ती वाढविणे नितांत गरजेचे आहे.
 
स्त्रीभ्रूण हत्या हे फार मोठे पाप आहे. ही मानिसकता थांबविण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. मुली, माता आणि भगिणींचे रक्षण व्हायलाच हवे. यात धर्माचा विचार व्हायलाच नको, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुंदेलखंड प्रांतातील महोबा येथे विशाल महापरिवर्तन रॅलीला संबोधित करताना सांगितले आहे. समाजातील स्त्रीभ्रूण हत्येच्या मानिसकतेवरही
त्यांनी सडकून टीका केली होती. तर स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी तसेच कोणत्याही वर्गातील पालकाला मुलीचे ओझे वाटू नये यासाठी मुलगीच हीच वंशाचा दिवा आहे हे बिबंवून देत मुलींच्या कल्याणार्थ अनेक योजना सरकारने हाती घेतल्या आहेत. मात्र, या योजनाअंतर्गत करावयाची कामे, उपाय-योजना तसेच व्यापक जनजागृती केवळ कागदावर होत असल्याचे चित्र सबंध जिल्ह्यात आजघडीला दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ‘ ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ  या अभियानाकडे पाहिल जातं.
 
२२ जानेवारी २०१५ पासून या अभियानाला सुरूवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात या अभियानाची एैशीतैशी होवून हे अभियान केवळ ‘सरकारी काम’ बनून राहिल्याने माँ जिजाऊंच्या जन्मभूमीत त्यांच्या लेकींना गर्भातच नख लावून मारल्या
जात आहे. परिणामी जिल्ह्यातील १२३ गावांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या ३० टक्याने कमी आहे. या १२३ गावांपैकी ३९ गावे एकट्या चिखली तालुक्यातील आहेत.
 
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या समतोल राहावी यासाठी २२ जानेवारी २०१५ पासून राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाच्या काळातीलच ही आकडेवारी असून चिखली तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य
केंद्रातील किन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सातगाव भुसारी, सोनेवाडी, हातणी, सवणा, तांबुळवाडी, अंत्रीकोळी आणि गोद्री या ७ गावांमध्ये सन २०१४-१५ मध्ये १२४ मुलांमागे ११५ मुलींची संख्या होती तर सन २०१५-१६ मध्ये आतापर्यंत १५१ मुलांमागे १०८ मुलींची संख्या आहे.
 
 
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाकडे केवळ घोषणा व सरकारी काम यादृष्टीने पाहल्या जात असल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता या संदर्भातली जनजागृती करण हे केवळ सरकारी काम नसून त्याला विविध पक्ष, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांची जोड आवश्यक असल्याने जिल्हाभरातील सर्व स्वयंसेवी संस्था, संघटना, मित्रमंडळे, पक्ष-संघटनांही
स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Web Title: In the Mathrirthi district, look at the 'Beti Bachao' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.