‘विवाह मंडळांनी जुळविलेल्या लग्नांची चौकशी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 03:47 AM2017-08-12T03:47:25+5:302017-08-12T03:47:28+5:30
राज्यातील कुठलेही वधू-वर सूचक मंडळ जर मुलींचे बळजबरीने लग्न लावून देत असल्याची किंवा मुलींची तस्करी करीत असल्याची तक्रार आली तर या मंडळामार्फत जेवढी लग्ने जुळवली असतील त्यांची चौकशी केली जाईल.
मुंबई : राज्यातील कुठलेही वधू-वर सूचक मंडळ जर मुलींचे बळजबरीने लग्न लावून देत असल्याची किंवा मुलींची तस्करी करीत असल्याची तक्रार आली तर या मंडळामार्फत जेवढी लग्ने जुळवली असतील त्यांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले.
लातूरमधील महिला तस्करीबाबत भाजपाच्या मनिषा चौधरी यांनी अल्पकालीन चर्चेला प्रारंभ केला. ज्या मुलींची नावे तेथील वधू-वर सूचक मंडळात नोंदवली होती त्यांची वृद्धांशी जबरदस्तीने लग्न लावली गेली. काँग्रेस सेवादलाचा पदाधिकारी या प्रकरणात गुंतलेला असल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यास आक्षेप घेतला. अशा प्रवृत्तींना पक्ष, जात, धर्म नसतो. अशाच पद्धतीने महिलांच्या शोषणात गुंतलेल्या भाजपा पदाधिकाºयांचे दाखले आम्हीही देऊ शकतो, असे गायकवाड म्हणाल्या. भारती लव्हेकर व मंदा म्हात्रे यांनीही चर्चेत भाग घेतला.
केसरकर म्हणाले की, लातूरमधून ३०० मुलींची तस्करी झालेली नाही. लातूरमध्ये २०१५ मुली ६१ मुली हरवल्या व त्या सर्व पुन्हा सापडल्या.