माटुंगा लेबर कॅम्प कडकडीत बंद

By admin | Published: November 10, 2014 03:37 AM2014-11-10T03:37:34+5:302014-11-10T03:37:34+5:30

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ माटुंगा लेबर कॅम्पमधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रविवारी कडकडीत बंद पाळला

Matunga Labor camp is closed | माटुंगा लेबर कॅम्प कडकडीत बंद

माटुंगा लेबर कॅम्प कडकडीत बंद

Next

मुंबई : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ माटुंगा लेबर कॅम्पमधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रविवारी कडकडीत बंद पाळला. नागरिकांनी विभागात शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून हत्याकांडाचा निषेध नोंदवला. हत्याऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी शाहू नगर पोलिसांना दिले.
आंबेडकरी चळवळीचा बाल्लेकिल्ला अशी ओळख असलेल्या माटुंगा लेबर कॅम्पमधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ बंदमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. दुपारी १२ वाजता डॉ. आंबेडकर रोडवरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शांततेच्या मार्गाने मोर्चा सुरू झाला. काळे झेंडे हाती घेऊन नागरिकांनी घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदवला. समता नगर, शाहू नगर आणि माटुंगा लेबर कॅम्प परिसरात मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात स्थानिक आमदार वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड, नगरसेवक विष्णू गायकवाड, माजी आमदार बाबूराव माने, संजय भालेराव, उषाताई करकटे, कांताबाई काळे, अनिल वाघमारे, सूरज डुलगज, बिल्लू चावरिया, अशोक बागुल, गौतम साळवे, सुभान भाई, मनसुखभाई आदी मान्यवरांसह विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विभागात मोर्चा काढल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी शाहू नगर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांना निवेदन दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Matunga Labor camp is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.