माऊली आली घरा !

By admin | Published: July 21, 2014 11:02 PM2014-07-21T23:02:09+5:302014-07-21T23:02:09+5:30

ज्ञानियांचा राजा, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सायंकाळी पावणोसहा वाजता अलंकापुरीत आगमन झाले. या वेळी माऊलींच्या जयघोषाने अवघी अलंकापुरी दुमदुमली होती.

Mauli came home! | माऊली आली घरा !

माऊली आली घरा !

Next
आळंदी : ज्ञानियांचा राजा, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सायंकाळी पावणोसहा वाजता अलंकापुरीत आगमन झाले. या वेळी माऊलींच्या जयघोषाने अवघी अलंकापुरी दुमदुमली होती.
सायंकाळी साडेपाच वाजता ज्ञानेश्वरमहाराज संस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख डॉ. शिवाजीराव मोहिते, डॉ. प्रशांत सुरू , श्यामसुंदर मुळे व राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, श्रीधर सरनाईक हे माऊलींना नैवेद्य घेऊन नवीन पुलाजवळ आले. त्यानंतर धार्मिक विधी झाल्यानंतर माऊलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. सायंकाळी 5.45 वाजता माऊलींच्या पालखीचे आळंदीत आगमन झाले. या वेळी माऊली माऊलींचा जयघोष करण्यात वारकरी दंग झाले होते.
नगर परिषद चौकात नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, उपाध्यक्ष राजेंद्र गिलबिले, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या हस्ते माऊलींच्या पालखीचे पुष्पहार घालून भव्य स्वागत करण्यत आले. या वेळी आळंदी शिक्षण मंडळ सभापती श्रीधर कु:हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, सुरेश वडगांवकर, नगरसेवक डी. डी. भोसले, अशोक कांबळे व नंदकुमार वडगांवकर, पै. बाळासाहेब चौधरी,  बाळासाहेब रावडे, संदीप नाईकरे, उत्तमराव गोगावले, ह.भ.प. ताई माऊली महाराज (मरकळ), सर्व नगरसेवक , नगरसेविका, ग्रामस्थ, वारकरी भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे महाद्वार येथे आगमन झाल्यानंतर व्यापारी, तरुण मंडळ, (आळंदी) यांच्या वतीने वारकरी, भाविक  भक्तांना सालाबादप्रमाणो महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश दिघे, उपाध्यक्ष महेश गोरे, संतोष बोरुंदिया, माऊली कु:हाडे, संजय कोलन, विलास कु:हाडे, माऊली दिघे, सागर गोरे  आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 
 
4माऊलींच्या पालखी रथापुढे मानाच्या दिंडय़ा, ज्ञानराज ब्रॅडचे पथक, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थी, सनई-चौघडा पथक, बाळू दगडू भोसले पाटील यांची मानाची बैलगाडी होती. माऊलींचा रथ विविध फुलांनी सजविण्यात आला होता. दुपारी तीन वाजेपासून आळंदी ग्रामस्थ, परिसरातील गावातील नागरिक, वारकरी, भाविक माऊलींच्या स्वागतासाठी देहूफाटा येथे दाखल झाले होते.
 
 
4माऊलींच्या दर्शनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी एकच गर्दी केली होती. टाळ-मृदंगाचा गजर व ज्ञानोबा-माऊली-तुकारामच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. अलंकापुरीतील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. चौकाचौकात पालखीचे स्वागत करण्यात येत होते. विविध सामाजिक संस्था, मंडळे यांच्यातर्फे केळीवाटप व फराळवाटप करण्यात आले.
 

 

Web Title: Mauli came home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.