माऊली सोपानकाकांच्या सासवड नगरीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2017 02:18 AM2017-06-21T02:18:12+5:302017-06-21T02:18:12+5:30

विठ्ठलनामाचा गजर करीत, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत हजारो वारकऱ्यांच्या समवेत, दिवे घाटाची अवघड चढण चढून संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा

Mauli sopankakera saasavad city! | माऊली सोपानकाकांच्या सासवड नगरीत!

माऊली सोपानकाकांच्या सासवड नगरीत!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : विठ्ठलनामाचा गजर करीत, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत हजारो वारकऱ्यांच्या समवेत, दिवे घाटाची अवघड चढण चढून संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा संत सोपानकाकाच्या सासवड नगरीत विसावला. सासवड येथे मंगळवार, बुधवार असा दोन दिवस मुक्काम आहे. सासवड येथील भव्य पालखी तळावर रात्री ८ वाजता सोहळा दाखल झाला.
तळावर वारकऱ्यांनी रिंगण केले होते. ज्ञानोबा-माऊलींचा गजर सुरू होता. चोपदारांनी दंड उंचवताच सर्वत्र शांतता झाली. हरवलेल्या व सापडलेल्या वस्तूंची माहिती देण्यात आली. या ठिकाणी ८.१५ वाजता समाज आरती झाली. गुरुवारी सकाळी निघायचे आहे, असे चोपदारांनी जाहीर केल्यावर माऊलींच्या नावाचा गजर झाला व वारकरी आपापल्या मुक्कामाचे ठिकाणी गेले.
पुरंदर तालुक्यातील हजारो भाविक आज माउलींच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी ठिकठिकाणी थांबले होते. दुपारी पाच वाजता दिवे घाट चढून आल्यावर झेंडेवाडी येथे अनेक मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले. रस्त्यात ठिकठिकाणी वारकाऱ्यांसाठी पाणी ,फराळाचे साहित्य वाटले जात होते. तरुण ,विद्यार्थी वाहतूक व्यवस्था पाहत होते. सासवड येथे पालखी तळाजवळ नियंत्रण कक्ष उभारला आहे तेथे सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित आहेत अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी औषधांची सोय आहे , पाणी पुरवठ्याची सोय केलेली आहे . रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होती.
दरम्यान, चंदन टेकडीनजीक पालखी रथाचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही क्षणानंतर पालखी मानकऱ्यांच्या खांद्यावर सासवडच्या पालखी तळावर आणण्यात आली. अनेक ठिकाणी भक्तांच्या दर्शनासाठी पालखी स्वागतासाठी थांबविण्यात आल्याने पालखीला विलंब झाला.

Web Title: Mauli sopankakera saasavad city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.