दक्षिण काशीत माउलीचे आगमन

By admin | Published: July 20, 2015 01:10 AM2015-07-20T01:10:11+5:302015-07-20T01:10:11+5:30

ज्ञानदेव म्हणे हरिजप करणेतुटेल धरणे प्रपंचाचे... हरिपाठातील ओव्या म्हणत पंढरीच्या विठू दर्शनासाठी आसुसलेला वैष्णवांचा मेळा

Mauli's arrival in South Kashi | दक्षिण काशीत माउलीचे आगमन

दक्षिण काशीत माउलीचे आगमन

Next

फलटण : ज्ञानदेव म्हणे हरिजप करणेतुटेल धरणे प्रपंचाचे...हरिपाठातील ओव्या म्हणत पंढरीच्या विठू दर्शनासाठी आसुसलेला वैष्णवांचा मेळा रविवारी सायंकाळी महानुभवांची दक्षिण काशी असलेल्या फलटणनगरीत मुक्कामासाठी स्थिरावला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ऐतिहासिक प्रभू श्रीरामांच्या फलटणनगरीत आगमन झाले, त्यावेळी सारे शहर ‘ज्ञानोबा माउलीं’च्या जयघोषाने दुमदुमून गेले.
आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या या सोहळ्याने निम्मे अंतर कापले आहे. फलटण शहराच्या सीमेवर जिंती नाका येथून माउलींचा रथ मलठण, संत हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक मार्गे ऐतिहासिक मुधोजी मनमोहन राजवाडा व प्रभू श्रीरामांच्या मंदिरासमोर येताच माउलींचे स्वागत राजघराण्याच्या वतीने यशोधराराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वागत केले.

Web Title: Mauli's arrival in South Kashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.