मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत तांत्रिक अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:42 AM2017-07-29T04:42:04+5:302017-07-29T04:42:08+5:30

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठाने एक हजार संगणक आणि ३५० प्राध्यापकांची फौज सज्ज ठेवली.

maunbai-vaidayaapaithaacayaa-utatarapataraikaa-tapaasanaita-taantaraika-adacanai | मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत तांत्रिक अडचणी

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत तांत्रिक अडचणी

googlenewsNext

कोल्हापूर : मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठाने एक हजार संगणक आणि ३५० प्राध्यापकांची फौज सज्ज ठेवली. मात्र, मुंबई विद्यापीठाकडून तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी विलंब होत असल्याने शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने तपासणीचे काम सुरू होऊ शकले नाही. शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर, सांगली व सातारा येथील उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांवर दिवसभरात ५०हून अधिक प्राध्यापक उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठाच्या मागणीनुसार कॉमर्स, मॅनेजमेंट आणि लॉ (विधि) अभ्यासक्रमांच्या ३५ हजार आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी करून देण्याबाबत शिवाजी विद्यापीठाने तयारी दर्शविली. त्यानुसार कोल्हापुरातील सायबर इन्स्टिट्यूट, मिरज येथील संजय भोकरे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट आणि सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पस या ठिकाणी केंद्रांची सुविधा केली आहे. तपासणीच्या कामासाठी मुंबई विद्यापीठाने पात्र ठरविलेले सुमारे ५०हून अधिक प्राध्यापक सकाळी या केंद्रांवर दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला नोंदणी केली. मात्र, युझर आणि लॉगीन आयडी उपलब्ध न होणे, ‘ओटीपी’ नोंदविल्यानंतर संगणकावर उत्तरपत्रिका न दिसणे अशा तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे बहुतांश प्राध्यापकांना नुसतेच बसून राहावे लागले. या तांत्रिक अडचणींची माहिती मुंबई विद्यापीठाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
साताºयात दोन तासांत काम गुंडाळले
सातारा जिल्ह्यातील निवडक सात प्राध्यापकांना अवघ्या दोन तासांत तपासणीचे काम गुंडाळावे लागले. यशोदा संस्थेत सुमारे ५०० संगणक, इंटरनेट सेवेसह हॉल सज्ज करण्यात आला होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास सात प्राध्यापकांनी हजेरी लावली. परंतु सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे येथे उत्तरपत्रिका डाऊनलोड झाल्या नाहीत, अशी माहिती यशोदा टेक्निकलचे रजिस्ट्रार गणेश सुरवसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘विद्यापीठाला घेराव घालणार’
३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर न झाल्यास काँग्रेसतर्फे मुंबई विद्यापीठाला घेराव घालणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठवाडा विद्यापीठाचा उत्तरपत्रिका तपासण्यास होकार
मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने होकार कळवला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठ विधि-अभ्यासक्रमाच्या ५ हजार उत्तरपत्रिका पाठवल्या आहेत.

Web Title: maunbai-vaidayaapaithaacayaa-utatarapataraikaa-tapaasanaita-taantaraika-adacanai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.