मुंबईतील विषबाधेच्या दुर्घटनेमुळे मावळात डॉक्टरांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 05:59 PM2018-08-10T17:59:44+5:302018-08-10T19:25:44+5:30
मुंबई येथे जंतनाशक गोळ्या मुलांना खायला दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या गोळ्यातून झालेल्या विषबाधेमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्व कर्मचाऱ्यांची गोळ्या परत मागवण्यासाठी धडपड सुरु झाली.
कामशेत : राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्यानिमित्त मुंबई येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यात काही मुलांना मुलांना विषबाधा झाली. त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १० ऑगस्ट ) घडली. मात्र, लोकमत ऑनलाईन न्यूजमध्ये नजरचुकीने कामशेतमध्ये विषबाधेमुळे एकाचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आला होता. मात्र, तशी कुठलीही घटना त्या परिसरात घडलेली नाही. परंतु, मुंबई येथील घटनेमुळे मावळ परिसरात डॉक्टर वर्गात एकच धावपळ झाली. कारण जंतनाशक दिनानिमित्त आंदर मावळातील काही भागांमध्ये आरोग्य विभाग, मावळ गटविकास अधिकारी यांच्याकडून जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. ज्या ज्या भागात या गोळ्या वाटण्यात आल्या त्या त्या संबंधीची माहिती तत्काळ माहिती घेण्यात आली.
सर्वत्र जंतनाशक दिन शुक्रवार [ दि. १० ] रोजी साजरा करण्यात येतो. यामध्ये १ ते १९ वयोगटातील सर्व मुला मुलीना जंतनाशकच्या गोळ्या देण्यात येतात. मावळ तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्र, मराठी शाळा, शासकीय अनुदानित माध्यमिक विद्यालय, आश्रम शाळा, तसेच १ ते १९ वयोगटातील शाळाबाह्य मुलांना या दिवशी सर्व अंगणवाडी, शाळा, सरकारी दवाखाने आदी ठिकाणी दरवर्षी मुलांना गोळ्या खाऊ घालण्यात येतात. या राष्ट्रीय योजनेसाठी सर्व अंगणवाडी सेविका, शिक्षा, आरोग्य कर्मचारी, सर्व आशा स्वयंसेविका काम करतात.
याविषयी महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी मुकुल वासनिक म्हणाले, आम्ही सर्वत्र भेट देत आहोत. एमओ आणि आशा वर्करला तपासणी करूनच गोळ्या द्या आणि काही अडचण आलीच तर एमओ किंवा पीएचओ यांना संपर्क करा अशी माहिती देण्यात आली आहे.
......................
आपल्या भागात जंतनाशक गोळ्या संबंधी काही अडचण अथवा कोणतीही काळजीवह घटना घडलेली नाही. तसेच मुलांविषयी आरोग्य विभागाविषयी सर्वच दृष्टीने काळजी घेत आले आहे . कारण या भागात कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर अनेक यंत्रणा प्रत्येक उपक्रमांची तत्परतेने याबाबत माहिती घेत आहेत- तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे