शिपायाने जमवली लाखोंची माया

By admin | Published: March 3, 2016 01:32 AM2016-03-03T01:32:57+5:302016-03-03T01:32:57+5:30

एका वकिलाच्या कार्यालयात शिपायाचे काम करणाऱ्या ठगाने चक्क शासनालाच गंडा घातला आहे. दुय्यम उपनिबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क रकमेचा आॅनलाइन चलन भरणा करताना

Mayan of the millions gathered! | शिपायाने जमवली लाखोंची माया

शिपायाने जमवली लाखोंची माया

Next

पिंपरी : एका वकिलाच्या कार्यालयात शिपायाचे काम करणाऱ्या ठगाने चक्क शासनालाच गंडा घातला आहे. दुय्यम उपनिबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क रकमेचा आॅनलाइन चलन भरणा करताना, चलनावर नमूद केला जाणारा आकडा एक, तर प्रत्यक्ष भरणा केलेली रक्कम वेगळीच अशा पद्धतीने थेरगावातील संतोष नामक भामट्याने अवघ्या सहा महिन्यांत लाखोंची माया गोळा केल्याचे निदर्शनास आले आहे. चलनातील रकमेचा घोळ एका बँकेच्या व्यवहारात निदर्शनास आला असून, अद्याप या भामट्याविरोधात कारवाई झालेली नाही.
एकाच सदनिकेचे दस्तऐवज अनेक बँकांमध्ये सादर करून सदनिका तारण ठेवून (मॉर्गेज लोन) वेगवेगळ्या बँकांची कर्जे मिळवली जातात. त्यात कर्जदारांकडून बँका, तसेच वित्त संस्थांची फसवणूक होण्याची शक्यता असते. ही फसवणूक टाळली जावी, म्हणून पूर्वकल्पना देणारी सूचनावजा नोटीस (नोटीस आॅफ इंटिमेशन) देण्याची प्रक्रिया अवलंबली जाते. या प्रक्रियेत बँका, गृहकर्ज देणाऱ्या वित्तसंस्था यांच्याकडील तारण मिळकतीचे मूळ दस्तऐवज, गहाणखत केलेले कागदपत्र, त्याची प्रत, कर्ज घेणारा, देणारा यांच्या स्वाक्षरीचे कागदपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात अर्जासोबत जोडावे लागतात. नोटीस आॅफ इंटिमेशन दस्तहाताळणीसाठी ३०० रुपये, नोंदणी शुल्कासाठी १ हजार रुपये घेतले जातात. या ई-चलन भरणा व्यवहारासाठी बँकांनी खासगी एजंटांना काम दिले आहे.
वकिलाच्या कार्यालयातील शिपाई संतोष नेहमी फ्रँकिंगची कामे करण्यासाठी बाहेर जात. त्याची दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी गट्टी जमली. त्याने चलन भरण्याची प्रक्रिया शिकून घेतली. ई चलन भरणा रकमेत घोटाळा करण्यासाठी त्याने काही कर्मचारी हाताशी धरले. ही प्रक्रिया पूर्ण समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष उपनिबंधक कार्यालयात न जाता, तो गट्टी जमलेल्या हवेली उपनिबंधक कार्यालय २४मधील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून कार्यालयात अथवा घरी बसूनच आॅनलाइन चलन भरू लागला. त्याच्या वर्तणुकीत झालेला बदल लक्षात येताच, वकिलाच्या कार्यालयातून त्याला कामावरून कमी केले. वकिलाच्या कार्यालयातून मिळालेल्या अनुुभवाच्या जोरावर त्याने बँका, वित्तसंस्थांशी संपर्क साधून टक्केवारी तत्त्वावर ई- चलन भरण्याचे काम घेतले. त्याने कोठुनही आॅनलाइन चलन भरले, तरी दुय्यम निबंधक कार्यालय हवेली २४ येथून त्याच्याशी संधान बांधलेले कर्मचारी ही प्रक्रिया पूर्ण करत होते. या कार्यालयात नवीन उपनिबंधक रुजू झाले. त्यांनी कार्यालयात काही बदल केले. तेथील आॅपरेटरला स्कॅनिंगचे काम दिले.(प्रतिनिधी)
> एका बँकेचा पाच लाखांचा घोटाळा
बँका, वित्तसंस्था यांच्याकडून कर्ज रकमेवरील ०.२ टक्के मुद्रांक शुल्काची रक्कम भरण्यास एजंटाकडे दिली जात होती. या रकमेपैकी केवळ १०० ते २०० रुपये रकमेचा भरणा करून शासनाच्या तिजोरीत जाणारी रक्कम उर्वरित सर्व रक्कम स्वत:च्या खिशात घालायचा.
हवेली दुय्यम निबंधक म्हणून रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनी या व्यवहारातील कागदपत्रांची तपासणी केली. फ्रँकिंगद्वारे भरणा केलेल्या दहा हजारांहून अधिक रकमेच्या चलनाऐवजी अवघे १०० रुपयांचे चलन भरून नोंदणी प्रक्रिया करून घेतल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी दिलेल्या रकमेची माहिती घेतली.
बँकेने दिलेली रक्कम आणि प्रत्यक्ष भरणा झालेली रक्कम यात प्रचंड तफावत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँकेचे व्यवहार तपासण्यात आले. त्या ठगाने या एकाच बँकेच्या चलन व्यवहारात पाच लाखांचा अपहार केल्याचे उघड झाले. या बँकेसह अन्य २० बँकांचे ई -चलन व्यवहारसुद्धा याच ठगाकडे असल्याने केवळ पाच लाखच नव्हे, तर आणखी मोठ्या रकमेचा अपहार केल्याचे उघड होण्याची शक्यता आहे.
कुटुंबातील सदस्य मजुरी करणारे, वकिलाच्या
कार्यालयात शिपाई पदावर काम करणाऱ्या, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या या ठगाकडे आता एक-दोन नव्हे, तर चार मोटारी आल्या आहेत.

Web Title: Mayan of the millions gathered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.