विरोधकांचे घृणास्पद आरोप पराभवाला कारणीभूत - मायावती
By admin | Published: May 18, 2014 01:00 AM2014-05-18T01:00:14+5:302014-05-18T01:00:14+5:30
लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचा एकही उमेदवार विजयी न झाल्याने संतापलेल्या मायावतींनी, विरोधकांचे घृणास्पद आरोप आणि मतदारांची दिशाभूल या मुद्दय़ांमुळे अपयश मिळाल्याचे सांगितले.
Next
>लखनौ : लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचा एकही उमेदवार विजयी न झाल्याने संतापलेल्या मायावतींनी, विरोधकांचे घृणास्पद आरोप आणि मतदारांची दिशाभूल या मुद्दय़ांमुळे अपयश मिळाल्याचे सांगितले.
मुस्लीम, मागासवर्ग व अन्य वर्गाच्या लोकांची दिशाभूल झाल्याने तसेच भाजपाने या निवडणुकीला जातीय रंग दिल्याने बसपाला मोठा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा, काँग्रेस, सपा व अन्य विरोधी पक्षांच्या षड्यंत्रमुळे हे घडल्याचे त्या म्हणाल्या. विशेषत: भाजपा नेते अमित शाह यांनी निवडणुकीच्या काही काळ आधी मुस्लीम भागात प्रक्षोभक भाषणो करून या निवडणुकीला
जातीय रंग दिला. यामुळे बसपाशी निगडित समाजाची बहुतेक मते भाजपाच्या खात्यात गेली. मुस्लीम व अन्य वर्गाची दिशाभूल करून मते फोडल्याने बसपाचा हत्ती आगेकूच करू शकला नाही, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)