लाचखोर अभियंत्याकडे कोट्यावधीची माया

By Admin | Published: July 6, 2016 05:47 PM2016-07-06T17:47:23+5:302016-07-06T17:47:23+5:30

सेवानिवृत्त अभिययंत्याकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महावितरण कंपनीच्या दोन्ही अभियंत्याकडे कोट्यवधीची माया असल्याचे उघड झाले

Mayor of billions of billionaire engineer | लाचखोर अभियंत्याकडे कोट्यावधीची माया

लाचखोर अभियंत्याकडे कोट्यावधीची माया

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ६ : सेवानिवृत्त अभिययंत्याकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी २५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महावितरण कंपनीच्या दोन्ही अभियंत्याकडे कोट्यवधीची माया असल्याचे उघड झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी कार्यकारी अभियंता गणेश पाचपोहे यांच्या धुळे व कल्याण तर सहायक अभियंता राजेंद्र काबरा यांच्या जळगाव येथील घराची झडती घेतली. त्यात दोघांच्या घरातून मालमत्तेचे कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे.

धरणगावला कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता पाचपोहे व राजेंद्र काबरा यांना मंगळवारी जळगाव येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची दि. ८ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने बुधवारी दोघांच्या घराची झडती घेतली.
पाचपोहे यांच्याकडे शेतीसह कल्याणला फ्लॅट

कार्यकारी अभियंता गणेश तुकाराम पाचपोहे हे कल्याण येथे राहतात. कल्याण येथील घराची झडती घेतली असता याठिकाणाहून ५६ लाखांचा वरटेक्स कल्याण येथील ८८० स्वे.फुटचा फ्लॅट, कल्याणमधील शिवकृपा सोसायटी नवीन मुरबाड येथील ३ लाख ६५ हजारांचा फ्लॅट, नवीन मुरबाड परिसरातील वृदांवन व्हॅली येथे १७ लाख ८२ हजाराचा फ्लॅट, याच ठिकाणी गाडी पार्किंगसाठी २० हजाराची जागा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे ५४ हजाराची बखळ जागा, रावेर येथे ८० हजारांचा बखळ प्लॉट, रावेर तालुक्यातील मुजलवाडी शिवारात २ हेक्टर ३० आर शेत जमिनीचा उतारा अशी कोटीच्या घरात मालमत्तेची कागदपत्रे मिळून आली.

साहाय्यक अभियंता लखपती
कार्यकारी अभियंता पाचपोहे याच्यासोबत लाचखोरीत सापडलेला साहाय्यक अभियंता राजेंद्र शंकरलाल काबरा याच्या शहरातील रिंगरोड परिसरातील जयनगरमधील व्यंकटेश अपार्टमेंट येथील घरझडतीमध्ये रोख रक्कमेसह विविध बँकांचे पासबुक, धनादेश हस्तगत करण्यात आले आहे. घरातील कपाटामध्ये २ लाख ८९ हजार २५० रुपए मिळून आले. फिक्स डीपॉझिटचे ४३ हजाराचे चार धनादेश मिळाले. स्टेट बँक आॅफ इंडियाचे तीन बचत खाते मिळून आले. तिघं खात्यांमध्ये एकूण २५ लाख ८ हजार रुपयांपर्यंत रक्कम आहे. तसेच पिपल्स को.आॅ.बँकेच्या लॉकरची चॉबी मिळून आली.

Web Title: Mayor of billions of billionaire engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.