कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा महापौर, राष्ट्रवादीचा उपमहापौर

By admin | Published: November 3, 2015 05:17 PM2015-11-03T17:17:45+5:302015-11-03T17:37:28+5:30

कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करण्याचे निश्चित केले असून काँग्रेसचे महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर असेल यावर एकवाक्यता झाली आहे

Mayor of Congress in Kolhapur, Deputy Mayor of NCP | कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा महापौर, राष्ट्रवादीचा उपमहापौर

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा महापौर, राष्ट्रवादीचा उपमहापौर

Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ३ - कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करण्याचे निश्चित केले असून काँग्रेसचे महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर असेल यावर एकवाक्यता झाली आहे. गेल्या महापालिकेतही या दोन पक्षाची आघाडी होती, त्यावेळप्रमाणेच अन्य खात्यांचे वाटप करण्यात येईल असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.
सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कोल्हापूरमध्ये २७ जागा जिंकल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने १५ जागा जिंकल्या. महापालिकेच्या ८१ जागांपैकी ४२ जागा या दोन्ही पक्षांनी जिंकल्या असल्यामुळे सत्तास्थापनेत कोणतीही समस्या निर्माण होणार नसल्याचेही स्पष्ट झाले.
आघाडीची सत्ता स्थापन करण्याचे निश्चित झाल्याचे सतेज पाटील आणि पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Mayor of Congress in Kolhapur, Deputy Mayor of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.