Corona Vaccine: लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 02:40 PM2021-04-25T14:40:45+5:302021-04-25T14:42:55+5:30

Corona Vaccine: महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली.

mayor kishori pednekar informed about corona vaccination drive in mumbai | Corona Vaccine: लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

Corona Vaccine: लस उपलब्धतेची खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे: महापौर

Next
ठळक मुद्देमहापौर किशोरी पेडणेकर यांची महत्त्वाची माहितीसर्वच स्तरावर नियोजन करण्याचा प्रयत्न - महापौरखात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे - महापौर

मुंबई: देशाप्रमाणे मुंबईसह राज्यातही कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी कोरोनाची लस उपलब्ध नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच काही लसीकरण केंद्रे बंद पडल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लसीकरण केंद्रावर कोरोनाची लस उपलब्ध आहे ना, याची खात्री करून मगच तेथे जावे, अशी सूचना यावेळी महापौर पेडणेकर यांनी केली आहे. (mayor kishori pednekar informed about corona vaccination drive in mumbai)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईत सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. मुंबईत ७ खासगी रुग्णालये आणि ३० सरकारी रुग्णालये आणि केंद्र अशा एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरू आहे, अशी माहिती पेडणेकर यांनी यावेळी बोलताना दिली. 

“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”

खात्री करून मगच लसीकरण केंद्रावर जावे

 लसींचा साठा टप्प्याटप्प्याने केंद्रावर दाखल होतो. आपण प्रत्येक वेळी सगळ्यांना दाखवतोय की, आपल्याकडे किती साठा आहे. लोकांनी लस घेण्यासाठी जाताना आधी खात्री करून जायला हवे. लसींचा साठा सकाळी १० वाजता येतो आणि त्यानंतर रुग्णालय, केंद्रांवर जातो. नागरिक जर त्याबाबत विचारपूर करून गेले, तर त्यांची धावपळ कमी होईल, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ, म्हणून चुकीची पावलं टाकतायत: माजी IPS अधिकारी

सर्वच स्तरावर नियोजन करण्याचा प्रयत्न

१ मे पासून आपण १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करणार आहोत. यासाठी सर्वच स्तरावर नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लसीकरणाचा साठा जसा पोहोचेल, त्यानुसार टप्प्यांनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा पद्धतीने लसी दिल्या जातील. उपलब्ध लसींचा साठा देखील बोर्डवर दाखवला जाईल. त्यानुसार लोकांनाही कळू शकेल, असे महापौरांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, शनिवारी राज्यात ६७,१६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर तब्बल ६३,८१८ जणांनी कोरोनावर मात केली असून, दुसरीकडे मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८२.०२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
 

Web Title: mayor kishori pednekar informed about corona vaccination drive in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.