कोल्हापूरच्या महापौरांची आज पक्षातून हकालपट्टी?

By admin | Published: March 1, 2015 01:26 AM2015-03-01T01:26:58+5:302015-03-01T01:26:58+5:30

महापौरपदाचा राजीनामा २८ फेब्रुवारीपर्यंत द्या, अन्यथा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेला

The mayor of Kolhapur is expelled from the party today? | कोल्हापूरच्या महापौरांची आज पक्षातून हकालपट्टी?

कोल्हापूरच्या महापौरांची आज पक्षातून हकालपट्टी?

Next

कोल्हापूर : महापौरपदाचा राजीनामा २८ फेब्रुवारीपर्यंत द्या, अन्यथा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेला इशारावजा पक्षादेश महापौर तृप्ती माळवी यांनी शनिवारी धुडकावल्याचे स्पष्ट झाले. शनिवारपर्यंतची मुदत संपल्यानंतरही माळवी यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे पक्षातून काढून टाकण्याची औपचारिकता रविवारी पार पाडली जाईल, असे सांगण्यात आले.
महापालिकेतील कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यातील सूत्रानुसार तृप्ती माळवी यांना महापौरपदावर काम करण्याची सहा महिन्यांकरिता मुदत दिली होती; परंतु त्यांची मुदत संपल्यानंतरही त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यातच त्या लाच घेतल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या. त्यामुळे राजीनामा देण्याचा दबाव वाढला होता. (प्रतिनिधी)

Web Title: The mayor of Kolhapur is expelled from the party today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.