महापौर माळवी यांची पक्षातून हकालपट्टी करा

By Admin | Published: March 5, 2015 01:30 AM2015-03-05T01:30:05+5:302015-03-05T01:30:05+5:30

स्वीय सहायकामार्फ त १६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महापौर तृप्ती माळवी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी,

Mayor Malvi expelled from the party | महापौर माळवी यांची पक्षातून हकालपट्टी करा

महापौर माळवी यांची पक्षातून हकालपट्टी करा

googlenewsNext

कोल्हापूर : स्वीय सहायकामार्फ त १६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महापौर तृप्ती माळवी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करणारा ठराव बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. या ठरावाची प्रत आणि वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे तातडीने पाठविण्यात आली.
माळवी यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने त्यांच्याविरोधात नगरसेवकांत कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. महापालिकेत बुधवारी राष्ट्रवादी नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीस २८ पैकी २६ नगरसेवक उपस्थित होते. नैतिकता म्हणून महापौरपदाचा राजीनामा देण्याचा आदेश माळवे यांनी धुडकावल्यामुळे पक्षाची बदनामी झाली असल्याचे मत नोंदविण्यात आले. त्यानंतर तृप्ती माळवी यांना पक्षातून काढून टाकावे, अशी मागणी करण्यात आली.

जिवाला धोका
महापालिकेतून बाहेर पडत असताना मंगळवारी नगरसेवकांनी आपल्या वाहनावर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून, या घटनेमुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात यावी तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अशी फिर्याद महापौर तृप्ती माळवी यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: Mayor Malvi expelled from the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.