महापौरांच्या पीएला लाचखोरीप्रकरणी कोठडी
By admin | Published: January 19, 2015 04:36 AM2015-01-19T04:36:14+5:302015-01-19T04:36:14+5:30
महापौरांचे स्वीय सहायक व नगररचनाकार विभागाचा लिपिक अंकुश कदम याला २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली
उल्हासनगर : महापौरांचे स्वीय सहायक व नगररचनाकार विभागाचा लिपिक अंकुश कदम याला २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्या दालनात कदम याला अटक केल्याने पाटणकर हेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी जाळ्यात सापडण्याचे चक्र नवीन वर्षातही सुरू असून, महापौर अपेक्षा पाटील यांचा स्वीय सहायक व नगररचनाकार विभागाचा लिपिक अंकुश कदम याला २० हजार रुपयांची लाच घेताना अटक झाली आहे. फाईलवर सही मिळवून देण्याच्या बहाण्याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची मागणी केल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली.