मेअखेरीस लागणार बारावीचा निकाल
By admin | Published: May 13, 2017 02:27 AM2017-05-13T02:27:31+5:302017-05-13T02:27:31+5:30
गेल्या काही दिवसांपासून दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत असलेली प्रतीक्षा आता संपत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत असलेली प्रतीक्षा आता संपत आहे. मे महिन्याच्या अखेरीस या परीक्षांचा निकाल लागणार असल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीे. बारावीच्या २० लाख ९ हजार उत्तरपत्रिका तपासून झाल्या असून, नियमकांकडून त्या जमा करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाबाबत अधिकृतपणे तारीख जाहीर केली नाही. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर करण्यास जून उजाडल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आराखड्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, तसेच शिैक्षणिक संस्थांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यात ताण येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ज्युनिअर कॉलेज प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याने निकाल प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता होती. मात्र, बहिष्कार मागे घेतल्यानंतर, प्राध्यापकांनी पेपर तपासणीसाठी घेतलेल्या मेहनतीमुळे यंदा हा निकाल वेळेआधीच, म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे.
दहावीचा निकालही वेळेवर-
प्राध्यापकांनी बारावीच्या पेपर तपासणीचे काम संपवल्यानंतर, मॉडरेटरमार्फत ते बोर्डाकडेही जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे अगदी मेच्या शेवटच्या आठवड्यातही हा निकाल लागण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. दहावीचा निकालही वेळेतच लागणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले.