एमबीए पेपरफुटी प्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: May 13, 2014 03:54 AM2014-05-13T03:54:10+5:302014-05-13T03:54:10+5:30
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्स अॅपवरून प्रश्नपत्रिका मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या साखळीचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. एमबीएच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राची मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. प्रसाद वाईकर या सिंहगड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने हे प्रकरण उघडकीस आणले. विद्यापीठाचे कुलासचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी सोमवारी चतु:शृंगी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रसाद वाईकर याचा जबाब नोंदवून घेत पुढील तपास सुरू केला आहे़ (प्रतिनिधी)