जुन्या पॅटर्नमधील प्रश्नांमुळे ‘एमबीए’च्या परीक्षेत गोंधळ
By admin | Published: May 12, 2015 02:07 AM2015-05-12T02:07:47+5:302015-05-12T02:07:47+5:30
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या एमबीए परीक्षेत सोमवारी गोंधळ झाला. मुंबई परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील सुमारे ४0 टक्के प्रश्न
मुंबई : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या एमबीए परीक्षेत सोमवारी गोंधळ झाला. मुंबई परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील सुमारे ४0 टक्के प्रश्न जुन्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. मुक्त विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांची परीक्षा राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर सुरू आहे. एमबीएच्या दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ८ तारखेपासून सुरू झाली आहे. सोमवारी या विद्यार्थ्यांचा ह्यबिझनेस इथिक्स आणि कापोर्रेट गर्व्हनन्सह्ण हा पेपर होता. या परीक्षेत दोन सेक्शन असतात. पहिल्या सेक्शनमध्ये ६० आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये ४० गुणांची परीक्षा असते. सोमवारी दुसऱ्या सेक्शनमध्ये जुन्या पॅटर्ननुसार केस स्टडीजवर प्रश्न विचारण्यात आले होते.
यापूर्वीच्या पेपरमध्येही जुन्या पॅर्टननुसार केस स्टडीजवर आधारित प्रश्न विचारण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या पॅटर्नची कोणतीही पूर्व सूचना दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. तर अॅडमिशनवेळीच नवीन पॅटर्नची माहिती दिल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)