‘एमसीए’ची सीईटी १९ मार्च रोजी

By admin | Published: February 6, 2017 03:06 AM2017-02-06T03:06:51+5:302017-02-06T03:06:51+5:30

राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षामार्फत मास्टर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेशासाठी दि. १९ मार्च रोजी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे

MCA's CET on March 19 | ‘एमसीए’ची सीईटी १९ मार्च रोजी

‘एमसीए’ची सीईटी १९ मार्च रोजी

Next

पुणे : राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षामार्फत मास्टर आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेशासाठी दि. १९ मार्च रोजी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. त्यासाठी ६ फेबुवारीपासून आॅनलाइन नोंदणी करता येणार आहे. राज्य चाचणी कक्षाने एमसीए-सीईटीचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. प्रवेश परीक्षेसाठी दि. ६ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आॅनलाइन नोंदणी करता येईल. दि. १० ते १९ मार्चदरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र मिळतील. तर दि. १९ मार्च रोजी सीईटी होणार असून, दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. परीक्षेसाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना १ हजार रुपये तर आरक्षित गटासाठी ८०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MCA's CET on March 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.