मी जबाबदार... माझा मास्क, माझी जबाबदारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेअर केले व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 04:55 PM2021-03-25T16:55:51+5:302021-03-25T17:02:21+5:30

Me Jababdar, Maza Mask, Mazi Jababdari Maharashtra CM Uddhav Thackeray launch new campaign : उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले व्हिडीओ

me jababdar maza mask mazi jababdari Maharashtra government uddhav Thackeray launch campaign | मी जबाबदार... माझा मास्क, माझी जबाबदारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेअर केले व्हिडीओ

मी जबाबदार... माझा मास्क, माझी जबाबदारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेअर केले व्हिडीओ

Next
ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले व्हिडीओव्हिडीओंद्वारे नागरिकांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पहिल्यांदाच राज्यात सर्वाधिक म्हणजेच ३१ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तर दुसरीकडे केवळ मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारी राज्यात २८ हजार ६९९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर सोमवारी राज्यात २४ हजार ६४५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी या पार्श्वभूमीवर निर्बंधही अधिक कडक करण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी गुरूवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. Me Jababdar, Maza Mask, Mazi Jababdari Maharashtra CM Uddhav Thackeray launch new campaign

'मी जबाबदार... माझा मास्क, माझी जबाबदारी' अशा मथळ्याखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तसंच मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचंही आवाहन करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात एक कॅम्पेन सुरू केल्याचं दिसत आहे. याद्वारे कायम हात स्वच्छ करत राहणं, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क परिधान करणं आवश्यक असल्याचा संदेश देण्यात आला आहे.





कोरोना महासाथीपासून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ

कोरोनानं मुंबईतही पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी चोवीस तासांमध्ये मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. कोरोना महासाथीपासूनची ही सर्वात मोठी रुग्णवाढ होती. दरम्यान, ही सर्वाधिक रुग्णवाढ असून कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे. सध्या मुंबई एकून साडेतीस हजारांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह केसेस असून रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के इतका आहे. सध्या राज्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ८४ दिवस असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. 

Web Title: me jababdar maza mask mazi jababdari Maharashtra government uddhav Thackeray launch campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.