ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप सर्वच सणांसाठी

By admin | Published: December 16, 2015 04:27 AM2015-12-16T04:27:50+5:302015-12-16T04:27:50+5:30

ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप केवळ गणेशोत्सव, नवरात्रौत्सव आणि दिवाळीपुरते मर्यादित न ठेवता, सर्वच धार्मिक सणांवेळी करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले.

Measurement of sound pollution for all the festivals | ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप सर्वच सणांसाठी

ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप सर्वच सणांसाठी

Next

मुंबई : ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप केवळ गणेशोत्सव, नवरात्रौत्सव आणि दिवाळीपुरते मर्यादित न ठेवता, सर्वच धार्मिक सणांवेळी करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रांच्या वेळी वाजवण्यात येणाऱ्या ढोल-ताशांच्या आवाजावरही निर्बंध घालण्याची सूचनाही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली.
सणांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येत असल्याने, राज्य सरकार व महापालिकांना संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ठाण्याचे रहिवासी महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती.

Web Title: Measurement of sound pollution for all the festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.