‘प्रसारमाध्यमे गुंतली प्रतिष्ठेत’
By Admin | Published: January 17, 2016 12:50 AM2016-01-17T00:50:32+5:302016-01-17T00:50:32+5:30
सध्या प्रसारमाध्यमे प्रतिष्ठेत गुंतली गेली आहेत. स्त्रियांची पारंपरिक चौकट मोडण्याचे धारिष्ट्य अजून माध्यमांनी केलं नाही, असे विधान परिसंवादात सहभागी राही भिडे यांनी ‘माध्यमातील
- सुवर्णा नवले, पिंपरी
सध्या प्रसारमाध्यमे प्रतिष्ठेत गुंतली गेली आहेत. स्त्रियांची पारंपरिक चौकट मोडण्याचे धारिष्ट्य अजून माध्यमांनी केलं नाही, असे विधान परिसंवादात सहभागी राही भिडे यांनी ‘माध्यमातील स्त्री प्रतिमा आणि भारतीय संस्कृती’ या दरम्यान केले.
परिसंवादात भिडे, सरिता कौशिक, जयू भाटकर, गुरय्या रेवणसिद्धया स्वामी, अनिल देवपूरकर, डॉ. अनिरुद्ध मोरे, अमृता मोरे सहभागी झाले होते.
परिसंवादात अनेक विषयांवर चर्चा झाल्या. त्यामध्ये प्रसारमाध्यमांमधील स्त्रियांची प्रतिमा, दृकश्राव्य माध्यमातील जाहिरातबाजी, महिलांभोवती टीव्ही चॅनेलचा विळखा, प्रसारमाध्यमांमध्ये होणारा महिला- पुरुषांमधील भेदभाव, प्रसारमाध्यमांमधील मनोरंजन, शनी मंदिरात महिलेला केलेला मज्जाव अशा विविध विषयांवर परिसंवादात चर्चा घडून आली.
तसेच, माध्यमांमध्ये स्त्रियांना हुशार, तेजस्वी राहावं लागणार आहे. खऱ्या स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू जोडलेले असतात. माध्यमे ही मनोरंजनाची साधने नाहीत. म्हणूनच मनोरंजनाशी संलग्न असलेल्या स्त्रीप्रतिमा संस्कृतीशी अनुरूप आहेत का, हे विचार करणे गरजेचे आहे.
स्त्रियांशिवाय प्रत्येक माध्यम अपुरे आहे. मात्र, स्त्रियांची प्रतिमा मलीन करण्याचा हक्क माध्यमांना नाही. स्त्रियांना प्रसारमाध्यमांमध्ये हवे तेवढे स्थान अद्यापपर्यंत भेटलेले नाही. यामुळेच प्रसारमाध्यमांमध्येही ती निर्णयप्रक्रियेमागे राहिली आहे.
स्त्रीचं व्यक्तिमत्त्व मोठं आहे. पण, तिची मोठी प्रतिमा दाखविण्याची उंची समाजात नाही. स्त्रीची पारंपरिक चौकट मोडण्याचं धैर्य माध्यमांनी केलं नाही.